ETV Bharat / entertainment

हातात मद्याचा ग्लास धरत मौनी रॉयचा बिनधास्त डान्स व्हिडिओ व्हायरल

author img

By

Published : Sep 15, 2022, 10:38 AM IST

मौनी रॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री हातात मद्याने भरलेला काचेचा ग्लास घेऊन धुंद अवस्थेत बीचवर नाचताना दिसत आहे. मौनी रॉयचा व्हिडिओ पहा...

मौनी रॉयचा बिनधास्त डान्स
मौनी रॉयचा बिनधास्त डान्स

मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटाची खलनायक मौनी रॉय सध्या यशाच्या शीखरावर आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून मौनीच्या भूमिकेचेही कौतुक होत आहे. आता मौनी रॉय चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करताना दिसत आहे. वास्तविक, मौनी रॉयचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती हातात ग्लास घेऊन समुद्रकिनाऱ्यावर जोरात नाचताना दिसत आहे.

मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मौनी रॉयने फिकट गुलाबी रंगाचा एक छोटा सेक्सी ड्रेस परिधान केला आहे आणि तिच्या हातात एक मद्याने भरलेला ग्लास आहे आणि इंग्रजी गाण्यावर ती थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत मौनी रॉयने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला माझे पाय आवडतात, जे नेहमी आयुष्याच्या तालावर नाचत असतात'.

आता या व्हिडिओवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाख 42 हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले आहे. मौनी रॉयचे चाहते या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि कमेंटमध्ये तिच्यासाठी हार्ट इमोजी टाकत आहेत.

एका चाहत्याने लिहिले आहे की, 'कोणी इतके सुंदर कसे असू शकते'. आणखी एका युजरने लिहिले आहे, 'मेरा चांद'. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, 'तू खरोखरच मजेदार आहेस'. इतकंच नाही तर चाहत्यांव्यतिरिक्त टीव्ही सेलिब्रिटींनीही मौनी रॉयचा हा अप्रतिम आणि चांगला व्हिडिओ लाइक केला आहे. यामध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि अँकर अर्जुन बिजलानीने व्हिडिओवर हार्ट इमोजी शेअर केला आहे. टीव्ही अभिनेत्री सृष्टी रोडे आणि दृष्टी धामी यांनीही मौनीच्या व्हिडिओवर सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा - मजा मा चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार माधुरी दीक्षित नेने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.