ETV Bharat / entertainment

LEO Movie : थलपथी विजय स्टारर 'लिओ'नं मोडला 'पोनियिन सेल्वन पार्ट 1'चा विक्रम....

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 2:53 PM IST

LEO Movie : साऊथ सुपरस्टार विजयचा आगामी चित्रपट 'लिओ' हा लवकरच चित्रपटगृहांमध्ये दाखल हो णार आहे. दरम्यान आता 'लिओ' चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटानं आतापर्यत किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी वाचा...

LEO Movie
लिओ चित्रपट

मुंबई - LEO Movie : साऊथचा सुपरस्टार विजयचा आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'लिओ'ची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचं परदेशात आगाऊ बुकिंग सुरू झालं आहे. परदेशात हा चित्रपट नवीन विक्रम करणार असे सध्या दिसतंय. 'लिओ' चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे ब्रिटन आणि युरोपमधील नवीन आकडे समोर आले आहेत. 'लिओ'ची क्रेझ परदेशात पाहायला मिळत असून या चित्रपटानं आगाऊ तिकीट बुकमध्ये 'पोनियिन सेल्वन पार्ट 1'चं विक्रम मोडला आहे. हा चित्रपट 'पठाण'चा विक्रम मोडणार की नाही हे पाहणं, लक्षणीय ठरणार आहे.

'लिओ'ची आगाऊ बुकिंग : विजयचा चित्रपट 'लिओ' आगाऊ बुकिंगच्या बाबतीत नवा इतिहास रचत असल्याचं निर्मात्यांनी सांगितलंय. 'लिओ' चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केलं आहे. आशिमा एंटरटेनमेंटनं यूके आणि युरोपमधील आकडे समोर आणले आहेत. परदेशात 'लिओ'ची 32,500 आगाऊ तिकिटं बुक करण्यात आल्याचं उघड झालं आहे. आता 'लिओ' हा लवकरच 'पठाण'चा विक्रम मोडणार असल्याचं सध्या दिसत आहे. 'पठाण'नं यूकेमध्ये पहिल्याच दिवशी 3 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. भारतीय चित्रपटसृष्टीतील 'पठाण' हा एकमेव चित्रपट आहे, ज्यानं यूकेमध्ये 3 कोटींचा टप्पा ओलांडला होता. आता 'लिओ' यूकेमध्ये 'पठाण'चा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

'लिओ' कधी रिलीज होईल? : 'लिओ' चित्रपटामध्ये विजय व्यतिरिक्त तृषा कृष्णन, संजय दत्त, अर्जूर सर्जा आणि प्रिया आनंद हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. 'लिओ' हा चित्रपट 250-300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला आहे. 19 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या चित्रपटामधील विजय आणि संजय दत्तचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. हा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांनी विजय आणि संजय दत्तचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं. या चित्रपटामध्ये संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Nayanthara and Vignesh shivan : नयनतारा आणि विघ्नेश शिवननं केलं ब्युटी ब्रँड लॉन्च; फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
  2. Vivik Agnihotri praised Alia Bhatt : विविक अग्निहोत्रीनं आलिया भट्टवर उधळली स्तुती सुमनं, प्रतिभेची केली प्रशंसा
  3. Anushka Sharma Pregnant ? : विराट कोहलीच्या घरी पुन्हा हलणार पाळणा, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.