ETV Bharat / entertainment

Kiara Advani and Sidharth Malhotra : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राला मुंबई विमानतळावर पापाराझीने केले स्पॉट...

author img

By

Published : Jul 19, 2023, 2:31 PM IST

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर अज्ञात स्थळी सुट्टी घालवण्यासाठी निघाले होते. यावेळी या लव्हबर्ड्सला पापाराझीने स्पॉट केले.

Kiara Advani and Sidharth Malhotra
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे आहे. या जोडप्याला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. या वर्षीच्या ७ फेब्रुवारीला हे जोडपे लग्नबंधनात अडकले होते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध लव्हबर्ड्स मंगळवारी सकाळी अज्ञातस्थळी रवाना झाले. कियारा आणि सिद्धार्थ मुंबई विमानतळावर कॅज्युअल लूकमध्ये दिसले होते.

कियारा आणि सिद्धार्थचा व्हिडिओ व्हायरल : इंस्टाग्रामवर पापाराझी अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, कियारा आणि सिद्धार्थ हे विमातळाच्या आत प्रवेश करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघे एकत्र खूप सुंदर दिसत होते. व्हिडिओमध्ये कियाराने पांढरा रंगाचा टँक टॉपसह बॅगी मिड-राईज जीन्स परिधान केला आहे. त्याचबरोबर तिने यावर एक गुलाबी रंगाची एक बॅग घेतली आहे. या लूकमध्ये ती फार खास दिसत आहे. तर दुसरीकडे, सिद्धार्थने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्यापट्ट्यासह पांढरी ट्रॅक पॅन्ट घातली आहे. या लूकमध्ये तो खूप देखणा दिसत असून तो कियारा काळजीपूर्वक विमानतळाच्या आत नेत आहे.

व्हिडिओला चाहते करत आहे लाईक : हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी या पोस्टला खूप जास्त लाईक केले आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट येत आहेत. व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहले, 'सर्वोत्तम जोडी'. दुसर्‍याने चाहत्याने लिहिले, सिडकियारा (आणि एक हृदय इमोजी) अशा अनेकप्रकारच्या या व्हिडिओवर कमेंट येत आहे. कमेंट विभाग पूर्ण हार्ट इमोटिकॉनसह भरलेले आहे.

वर्क फ्रंट : दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थच्या वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर ती शेवटी समीर विद्वांसच्या 'सत्यप्रेम की कथा'मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. तसेच आता तिच्याकडे 'गेम चेंजर' या चित्रपटासह 'किटी' देखील आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत राम चरण दिसणार आहे. तसेच काही रिपोर्टनुसार कियाराने वॉर २ चित्रपट साइन केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ लवकरच दिशा पटानीसोबत अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'योधा'मध्ये दिसणार आहे. याशिवाय, तो आगामी इंडियन पोलिस फोर्स वेब सीरिजमधून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे.

हेही वाचा :

  1. Project K first glimpse : प्रभास आणि राणा दग्गुबाती 'प्रोजेक्ट के' इव्हेन्टसाठी सॅन दिएगोमध्ये दाखल
  2. baipan bhari deva box office collection day 19 : 'बाई पण भारी देवा' चित्रपटाची १९ दिवसात ५५.३० कोटींची कमाई
  3. Isha Ambani And Alia Bhatt : आलिया भट्टच्या कपड्यांचा ब्रँड खरेदी करणार ईशा अंबानी; जाणून घ्या किंमत..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.