ETV Bharat / entertainment

Karan Johar greets Priyanka Chopra : करण जोहरने प्रियांका चोप्राला मारली कडकडून मिठी, नेटिझन्स म्हणाले, 'कुणीतरी बोलवा कंगनाला'

author img

By

Published : Apr 1, 2023, 11:22 AM IST

मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) उद्घाटन समारंभात करण जोहरने प्रियांका चोप्राला मारली कडकडून मिठी मारल्याचे दृष्य पाहायला मिळाले. काही दिवसापूर्वी कंगनाने करणवर टीका करत प्रियंका चोप्राच्या बॉलिवूडमधून बाहेर पडण्यासाठी करण जोहर जबाबदार होता, असे म्हटले होते. यामुळे या भेटीवर सध्या भरपूर चर्चा होत आहे.

करण जोहरने प्रियांका चोप्राला मारली कडकडून मिठी
करण जोहरने प्रियांका चोप्राला मारली कडकडून मिठी

मुंबई - नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) चे उद्घाटन हे एक तारे तारकांची मांदियाळी जमा करणारे होते. जिओ वर्ल्ड गार्डन्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे शुक्रवारी रात्री सेलिब्रेटी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बी-टाउन सेलिब्रिटींपासून हॉलिवूड स्टार्सपर्यंत आणि संगीत आणि कला समुदायातील कित्येक दिग्गजांनी कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शविली ज्यामध्ये प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांनी मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससह मुंबई गाठली होती. प्रियंका चोप्राच्या अलिकडील एका मुलाखतीनंतर बॉलिवूडमधील राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे तिची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती.

कंगनाने करण जोहरवर केली होती टीका - अलिकडेच डॅक्स शेपर्डला दिलेल्या मुलाखतीत, प्रियांकाने सांगितले की ती कामाच्या शोधात भारत सोडून आली होती. इथल्या प्रस्थापित लोकांनी तिला कोपऱ्यात ढकलण्याचे काम सुरू केल्यामुळे म्यूझिकच्या माध्यमातून कामाच्या शोधात ती पश्मिमेकडील देशात आली होती. या मुलाखतीत प्रियांकाने कोणाचेही नाव घेऊन टीका केली नव्हती. मात्र कंगनाने करण जोहरचे नाव घेत त्यानेच प्रियंकाला छळल्याचे व कामावर बंदी घातल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली होती.

करण जोहर आणि प्रियांका चोप्राची भेट - नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनासाठी प्रियांका पती निकसह पोहोचली तेव्हा तिथे करण जोहर हजर होता. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. करणने निक जोनासला शुभेच्छा दिल्या व दोघांच्यासोबत भरपूर गप्पा मारल्या. NMACC इव्हेंटमध्ये करण आणि प्रियांका मिठी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका पापाराझीने इन्स्टाग्रामवर प्रियांका चोप्रा आणि करणचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच, नेटिझन्सने कंगनाची आठवण झाली. एकाने दोघांच्यात काय गप्पा झाल्या असतील याबद्दल लिहिले, 'करण जोहर प्रियंकाला म्हणाला : कंगनाने तुझ्या नावावरुन मला पुन्हा त्रास दिला, मी काय करु'. तर एकाने लिहिले, 'कुणीतरी बोलवा कंगनाला.' आता करण आणि प्रियांकाच्या या गळाभेटीनंतर कंगनाची काय प्रतिक्रिया येते ते पाहणे मजेशीर असेल.

हेही वाचा - Sarja Trailer : ग्रामीण बाज असलेली ही एक प्रेम कथा ‘सर्जा' ची चित्रझलक प्रदर्शित!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.