ETV Bharat / entertainment

Kangana perform Ravan Dahan : कंगना रणौतच्या हस्ते होणार दिल्लीतील रावण दहन, लव कुश रामलीला समितीचा ऐतिहासिक निर्णय

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 1:17 PM IST

Updated : Oct 24, 2023, 5:11 PM IST

Kangana perform Ravan Dahan : दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील लव कुश रामलीला येथे रावण दहनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच महिलेच्या हातून पार पडेल. हा मान कंगना रणौतला देण्यात आलाय. यामुळे कंगना आनंदी असून समितीच्या अध्यक्षांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

Kangana perform Ravan Dahan
कंगना रणौतच्या हस्ते होणारे दिल्लीतील रावण दहन

मुंबई - Kangana perform Ravan Dahan : दिल्लीच्या ऐतिसाहसिक लाल किल्यामध्ये लव कुश रामलीला समितीच्या वतीनं रावण दहनाचा उत्सव पारंपिरक पद्धतीनं साजरा जातो. या उत्सवात पहिल्यांदाच रावणाचा पुतळा दहन करण्यासाठीचा रामबाण एक महिला सोडणार आहे. अभिनेत्री कंगना रणौतला पहिला ऐतिहासिक मान मिळणार आहे. तिनं आपल्या सोशल मीडिया पोस्टवरुन याचा खुलासा केला आहे तर दिल्लीतील लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंग यांनी या महत्त्वपूर्ण घडामोडीला अधिकृतपणे दुजोरा दिलाय.

कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तिनं आगामी कार्यक्रमाबद्दल चर्चा केलीय आणि तिच्या आगामी चित्रपट 'तेजस'बद्दल भाष्य केलंय. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, तिनं या कार्यक्रमाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर देत म्हटलंय की, 'या वर्षी लाल किल्ल्यावर लव कुश रामलीला समितीच्या ५० व्या वार्षिक उत्सवाचा हा एक महत्त्वपूर्ण क्षण आहे, कारण रावणाचा पुतळा जाळण्यात एक महिला पुढाकार घेतेय. जय. श्री राम.'

लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी खुलासा केला की, 'समितीच्या निर्णयावर संसदेनं सप्टेंबरमध्ये मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाचा प्रभाव होता. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या उत्सवात व्हिआयपी होते, त्यामध्ये काही कलाकार, राजकारणी आमच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच अजय देवगण आणि जॉन अब्राहम सारखे चित्रपट कलाकार सहभागी झाले आहेत. अभिनेता प्रभासनं गेल्या वर्षी रावणाचे दहन केलं होतं. आमच्या ५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला रावणाच्या पुतळ्याला आग लावणार आहे.'

कंगना सध्या तिच्या तेजस चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होणार आहे. सर्वेश मेवारा लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात कंगना भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत आहे. रावण दहनात प्रथमच महिला सेलिब्रिटी सहभागी होत असल्याने नेटिझन्सच्याही तिनं टाळ्या मिळवल्या आहेत आणि ही परंपरा पुढे नेण्यासाठी कंगना रणौतनं धनुष्यबाण हाती घेतल्याचं पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

हेही वाचा -

  1. Leo Box Office Collection Day 6: थलापथी विजय स्टारर 'लिओ'नं बॉक्स ऑफिसवर मारली बाजी; रिलीजच्या सहाव्या दिवशी करेल इतकी कमाई...

2. Raj Kundra On Ut69 : चित्रपट बनवायचा विचार नव्हता : राज कुंद्रानं केला 'ut69' च्या निर्मितीचा खुलासा

3. Bigg Boss 17 : वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये स्पर्धकांच्या आयुष्यातील रहस्ये येणार समोर...

Last Updated : Oct 24, 2023, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.