ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut claims : करण जोहरनेच प्रियांका चोप्राचा छळ केला आणि बंदी घातली, कंगना रणौतचा सनसनाटी दावा

author img

By

Published : Mar 28, 2023, 6:01 PM IST

कंगना रणौतने करण जोहरवर आणखी एक धक्कादायक आरोप केला सुपरस्टार शाहरुख खानसोबतच्या मैत्रीमुळे प्रियांका चोप्रावर करणने बंदी घातली होती, असा दावा तिने केला आहे.

कंगना रणौतचा सनसनाटी दावा
कंगना रणौतचा सनसनाटी दावा

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बिनधास्त बोलताना मागचा पुढचा विचार करत नाही. तिने मंगळवारी चित्रपट निर्माता करण जोहरवर आरोप केला की, सुपरस्टार शाहरुख खानसोबतच्या मैत्रीमुळे त्याने जागतिक स्टार प्रियांका चोप्रा जोनासवर बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी बंदी घातली. प्रियांकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की हिंदी सिनेसृष्टीने तिला कोपऱ्यात ढकलले. बॉलिवूडमधील राजकारणाला कंटाळून तिने हिंदी सिनेमातून ब्रेक घेतला व देश सोडला.

बॉलिवूडमधील प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कंगनाला प्रियंकाचा हा खुलासा आयतं कोलीत म्हणूनच मिळाला. करण जोहरवर यापूर्वी अनेकदा बॉलिवूड माफिया म्हणत तिरस्कार करणाऱ्या कंगनाने प्रियंकावर झालेल्या अन्यायाचे खापर करण जोहरच्या माथी फोडले आहे. कंगनाने आपल्या ट्विटच्या आधारे आरोपांच्या फैरी झाडल्या. प्रियांका चोप्रा म्हणते की ती यूएसला गेली कारण बॉलीवूडमधील लोकांसोबत तिचे बिनसले होते. तिला एक कोपऱ्यात ढकलले जात होते, ती या राजकारणाला कंटाळले होती., असे म्हणत कंगनाने ट्विट केले: 'प्रियांका चोप्राचे बॉलीवूडबद्दल असेच म्हणणे आहे, लोकांनी तिच्या विरोधात टोळी तयार केली, तिला धमकावले आणि तिला फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर काढले. एका सेल्फ मेड महिलेला भारत सोडायला लावले होते. सर्वांना माहित आहे की करण जोहरने तिच्यावर बंदी घातली होती.'

  • This is what ⁦@priyankachopra⁩ has to say about bollywood, people ganged up on her, bullied her and chased her out of film industry” a self made woman was made to leave India. Everyone knows Karan Johar had banned her (1/2) https://t.co/PwrIm0nni5

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) March 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तिने असेही म्हटले की करणने प्रियंकाचा छळ केला, ज्यामुळे तिला देश सोडावा लागला. शाहरुख खानशी प्रियंकाची मैत्री असल्यामुळे करण जोहर तिच्याशी असे वागल्याचा दावाही कंगनाने केला. तिने पुढे ट्विट केले: या घृणास्पद, मत्सरी, क्षुद्र आणि विषारी व्यक्तीला चित्रपट उद्योगाची संस्कृती आणि वातावरण नष्ट करण्यासाठी जबाबदार धरले पाहिजे जे एबी किंवा एसआरकेच्या काळात कधीही बाहेरच्या लोकांसाठी प्रतिकूल नव्हते. त्याच्या टोळी आणि माफिया पीआरवर छापे टाकले पाहिजेत आणि बाहेरील लोकांना त्रास देण्यासाठी जबाबदार धरले पाहिजे, असा घणाघाती टीकाही कंगनाने केली आहे. कंगना नेहमीच करण जोहरच्या विरोधात बोलत आली आहे. आता तिला विवेक अग्नीहोत्रीसारख्या दिग्दर्शकांचीही साथ मिळत आहे.

हेही वाचा - Allu Arha is born superstar : अल्लू अर्हा 'जन्मजात सुपरस्टार', समंथाने केले अल्लु अर्जुनच्या मुलीचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.