ETV Bharat / entertainment

Pankaj Tripathi Kadak Singh look: पंकज त्रिपाठीचा 'कडक सिंग' फर्स्ट लूक प्रदर्शित

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 4:41 PM IST

Kadak Singh Movie : पंकज त्रिपाठीच्या आगामी 'कडक सिंग' चित्रपटातील फर्स्ट लूक गुरुवारी निर्मात्यांनी रिलीज केला आहे. हा चित्रपट अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केला आहे.

Kadak Singh
कडक सिंग

मुंबई - Kadak Singh Movie: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी त्याच्या आगामी चित्रपट 'कडक सिंह'मुळं चर्चेत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहत आहेत. 'कडक सिंह' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांनी पंकज त्रिपाठीचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित 'कडक सिंग' या चित्रपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट झी5 प्लॅटफॉर्मवर (ZEE5) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी व्यतिरिक्त संजना सांघी, जया अहसान, पार्वती थिरुवोथू, दिलीप शंकर, परेश पाहुजा आणि वरुण बुद्धदेव हे कलाकार दिसणार आहेत.

'कडक सिंग'मधील पंकज त्रिपाठीचा फर्स्ट लूक रिलीज : पंकज त्रिपाठी यांनी कडक सिंग चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, 'अनेक कथा पण एकच सत्य. 'कडक सिंग' खोट्याच्या पलीकडे बघू शकणार का? कडक सिंग चित्रपटच्या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठीचे भाव गंभीर दिसत आहेत. विविध रूपांमधील नातेसंबंध दर्शविणारा, हा चित्रपट भिन्न दृष्टीकोन सादर करताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अकार्यक्षम कुटुंबाचा प्रवास चित्रित केला आहे. आकर्षक आणि थरारक सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकानं खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

पंकज त्रिपाठीचा 'कडक सिंग' चित्रपट : अनिरुद्ध रॉय चौधरी आणि पंकज त्रिपाठी, यांना त्यांच्या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अनिरुद्ध सोबतचा पंकज त्रिपाठीचा दुसरा प्रोजेक्ट आहे. आयएमडीबीनुसार (IMDb) पंकज त्रिपाठी चित्रपटात 'कडक सिंग'मध्ये एके श्रीवास्तवची भूमिका साकारत आहे. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पंकज त्रिपाठी यांना 'मिमी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. 'मिमी' चित्रपटामधील पंकज त्रिपाठीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. 'कडक सिंग' व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी 'मेट्रो इन दिनो' आणि' स्त्री-२' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. BB 17 Promo : सलमानच्या 'बिग बॉस'मध्ये कतरिना कैफ 'टायगर 3'चं करणार प्रमोशन
  2. warrant against Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
  3. Pippa screening: ईशान खट्टर स्टारर 'पिप्पा'च्या स्क्रिनिंगला मीरा राजपूतनं लावली हजेरी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.