ETV Bharat / entertainment

Jawan Box Office Collection : पहिल्याच दिवशी शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट घेणार मोठी झेप...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 12:45 PM IST

Jawan box office collection day 1: शाहरुख खानचा नुकताच रिलीज झालेला 'जवान' हा पहिल्या दिवशी 75 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित हा चित्रपट सध्या रूपेरी पडद्यावर धुमाकूळ घालत आहे.

Jawan box office collection day 1
जवान बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

मुंबई - Jawan box office collection day 1 : शाहरुख खान आणि अ‍ॅटली पहिल्यांदाच 'जवान' चित्रपटाद्वारे एकत्र आले आहेत. 'जवान' हा आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून सिनेमागृहांबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रचंड कमाई करेल असे सांगितल्या जात आहे. 'जवान'मध्ये साऊथमधील कलाकार मोठ्या संख्येने आहेत. 'जवान'चे काम सहा हाय-प्रोफाइल अ‍ॅक्शन डायरेक्टर्सला दिले आहेत. या चित्रपटामध्ये किंग खानने वडील आणि मुलाची दुहेरी भूमिका साकारली आहे. चित्रपट विश्लेषकांच्या मते 'जवान' हा 65-70 कोटी कमाई देशांतर्गत करू शकतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'जवान'ची अंदाजे कमाई : सॅकनिल्कच्या अंदाजानुसार हा चित्रपट भारतात 75 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. याशिवाय हा चित्रपट जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज वर्तविला जात आहे. 'जवान' चित्रपट 'पठाण'चा विक्रम मोडेल असे बोलले जात आहे. सॅकनिल्कच्या मते 'पठाण'चा पहिल्या दिवशीचा आकडा 57 कोटी होता. 'जवान' चित्रपटाची एकूण व्याप आणि अचूक 1 दिवसाचे कलेक्शन अजून बाकी आहे. 'जवान' अचूक कलेक्शनाचे आकडे लवकरच समोर येतील. 'जवान'ने पहिल्या दिवशी 14 लाखांहून अधिक तिकिटे विकली होती. जयपूर, मुंबई आणि कोलकाता येथे चित्रपटाचे पहाटेचे शो असल्यानं 'जवान' पहिल्या दिवशी जोरदार सुरूवात करेल. सिंगल-स्क्रीन थिएटर तसेच मल्टिप्लेक्स या दोन्ही ठिकाणी 'जवान'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • Looks Like, #Jawan 4 days weekend advance is more than #Pathaan 5 days weekend.💥💥#Pathaan was 68.18 Cr Gross; Now #Jawan is estimated 70+ Cr Gross;

    Exact data in the morning!!✅

    All Time Highest For Bollywood!!✅

    — Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) September 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'जवान' रूपेरी दाखवत आहे जादू : 'जवान' हा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाचे खूप कौतुक करत आहे. जवानमधील काही व्हि़डिओ सोशल मीडियावर चाहते शेअर करत आहेत. 'जवान'मध्ये शाहरुखचे वेगवेगळे रूप चाहत्यांना पाहायला मिळाले आहे. या चित्रपटातील गाणी देखील चाहत्यांना आवडत आहे. 'जवान'मध्ये शाहरुख खानसोबत विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणने या चित्रपटात कॅमिओ केला आहे. 'जवान' चित्रपट पाहिल्यानंतर शाहरुखचे चाहते चित्रपटगृहांबाहेर आनंद व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

  1. Shah Rukh Khan Jawan Movie : 'जवान' चित्रपटाद्वारे शाहरुख खाननं जिंकली चाहत्यांची मनं...
  2. Huddi film to release on 7th Sept: नवाजुद्दीनचा 'हड्डी' विनाअडथळा ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार, स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  3. Mahesh Babu Tweet : महेश बाबूनं 'एक्स'द्वारे दिलेल्या शुभेच्छांना दिला शाहरुखनं रिप्लाय...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.