ETV Bharat / entertainment

जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिळाला अंतरिम जामीन

author img

By

Published : Sep 26, 2022, 1:28 PM IST

जॅकलिन फर्नांडिसला मिळाला अंतरिम जामीन
जॅकलिन फर्नांडिसला मिळाला अंतरिम जामीन

जॅकलिन फर्नांडिसला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर करण्यात आले होते.

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात थोडासा दिलासा मिळाला आहे. आज जॅकलिनला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर करण्यात आले होते. सक्तवसुली संचालनालयाने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यानुसार सुकेश चंद्रशेखरवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ईडीने जॅकलिन फर्नांडिसला आरोपी करत अलीकडेच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

न्यायालयाने जॅकलिनला २६ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला दोनदा चौकशीसाठी बोलावले आहे. मनी लॉंड्रिंगप्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोट्यवधींच्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप तिच्यावर आहे. आरोपी सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे.

विशेष म्हणजे जॅकलिनवर सुकेश चंद्रशेखरकडून महागड्या भेटवस्तू आणि मोठी रक्कम घेतल्याचा आरोप आहे. केवळ जॅकलीनवरच नाही तर तिला आकर्षित करण्यासाठी सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनच्या ( Actress Jacqueline Fernandez ) ड्रेस डिझायनर आणि तिच्या जवळच्या लोकांनाही महागड्या भेटवस्तू देऊन जॅकलीनला आपल्याकडे आकर्षित केले होते. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही खूप व्हायरल झाले आहेत.

जॅकलीनला सुकेशशी लग्न करायचे होते : महाठग सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसने धक्कादायक खुलासा केला होता. जॅकलिनने खुलासा केला की सुकेश तिच्या स्वप्नांचा राजकुमार आहे आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे. ईडीच्या आरोपपत्रात सुकेशने जॅकलिनला करोडो रुपयांच्या मौल्यवान भेटवस्तू आणि अनेक महागड्या दागिन्यांच्या भेटवस्तू दिल्याचे उघड झाले असून सुकेश-जॅकलिनच्या वैयक्तिक गोष्टीही समोर आल्या आहेत.

हेही वाचा - विक्रम वेधाचे जबरदस्त शीर्षक गीत बंदे रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.