ETV Bharat / entertainment

'It's Rocky Day : रणवीर सिंगच्या वाढदिवशी दिग्दर्शकने शेअर केले 'रॉकी रानी की प्रेम कहानी'तील सर्वोत्कृष्ट फोटो

author img

By

Published : Jul 6, 2023, 3:38 PM IST

रणवीर सिंगच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त, त्याचा आगामी चित्रपट 'रॉकी रानी की प्रेम कहानी'चा दिग्दर्शक करण जोहरने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Rocky Day
रॉकी डे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग ६ जुलै रोजी ३८ वर्षांचा झाला आहे. रणवीर सिंगने २०१० मध्ये बँड बाजा बारात या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. रणवीर आज बॉलिवूडमधील टॉप कलाकारांच्या यादीत आहे. रणवीर सिंगची फॅन फॉलोइंगही फार जास्त आहे. दरम्यान, चाहते आणि सेलिब्रिटी सुद्धा रणवीरला त्याच्या ३८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत. या खास प्रसंगी रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा आगामी रोमँटिक फॅमिली ड्रामा चित्रपट 'रॉकी रानी की प्रेम कहानी'चा दिग्दर्शक करण जोहरने रणवीर सिंगला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

करण शेअर केले सोशल मीडियावर फोटो : करण जोहरने 'रॉकी रानी की प्रेम कहानी'च्या सेटवरील न पाहिलेली काही फोटो शेअर करत लिहले, रणवीर सिंगला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आज रॉकीचा दिवस आहे, निसर्गाच्या या अद्भुत निर्मितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आमच्या 'रॉकी रानी की प्रेम कहानी' चित्रपटाला तुम्ही मनापासून प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद, रणवीर सिंग, तुझ्यावर नेहमीच प्रेम.

बीटीएस फोटो पहा : रणवीर सिंगच्या नावाने या वाढदिवसाच्या पोस्टमध्ये करण जोहरने चित्रपटातील सहा BTS (बिहाइंड द सीन) फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो गाण्याच्या सेटचा आहे, ज्यामध्ये करण आणि रणवीर एकत्र आहेत. दुसऱ्या फोटोत करणच्या हातात साखळी आहे आणि रणवीर सिंग त्याच्यासमोर उभा आहे. या सर्व फोटोंपैकी तिसरा फोटो सर्वात नेत्रदीपक आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग धिंडोरा गाण्याच्या सेटवर करण जोहरला मिठी मारत आहे आणि राणी म्हणजेच आलिया त्यांचा फोटो काढत आहे. चौथा फोटो हा सकाळच्या सेटचा आहे, ज्यामध्ये रणवीर आणि करणच्या चेहऱ्यावर झोप दिसत आहे. पाचव्या फोटोत करण आणि रणवीर फुल स्टाइल आणि स्वॅगमध्ये दिसत आहेत. तसेच शेवटच्या फोटोत करण आणि रणवीर काश्मीरच्या थंडीत गरम कपडे घातलेले दिसत आहेत. हा चित्रपट २८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक फार आतुरतेने पाहत आहे.

हेही वाचा :

  1. Sameer Wankhede Issue : लाच घेणारा तसेच लाच देणारा देखील आरोपी; समीर वानखेडेंच्या वकिलांचा न्यायालयात सवाल
  2. Adipurush box office collection Day 20 : 'आदिपुरुष' चित्रपट २० दिवसात आला व्हेंटिलेटरवर...
  3. Ranveer Singh birthday : रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्य दीपिकाने शेअर केला क्रिस्पी केक, करण जोहरनेही दिल्या शुभेच्छा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.