वर्ल्ड कप जिंकला तर कपडे; 'या' अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट

वर्ल्ड कप जिंकला तर कपडे; 'या' अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट
World Cup 2023 Final : देशभरात वर्ल्ड कपचा जल्लोष आहे. अनेक स्टार्स विश्वचषकच्या अंतिम सामान्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, तेलुगू अभिनेत्री रेखा बोजनं भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यापूर्वी वादग्रस्त विधान केलं आहे, त्यामुळं ती चर्चेत आली आहे. तिच्या वक्तव्यामुळं तिला अनेकजण सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.
मुंबई World Cup 2023 Final : सध्या देशभरात वर्ल्ड कप 2023 ची क्रेझ पाहायला मिळत आहे. विश्वचषक सामन्यासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक आहे. त्याचबरोबर टीम इंडियानं वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये आपले स्थान पक्के केल्यानंतर अनेकजण भारतीय संघाला चिअर करत आहेत. भारतीय संघानं 9 पैकी 9 सामने आतापर्यत जिंकले आहेत. आज 19 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळला जात आहे. सध्या बॉलिवूडसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येही क्रिकेटची क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान तेलुगू अभिनेत्री रेखा बोजनं भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यापूर्वी एक वादग्रस्त विधान केल्यानंतर ती सध्या चर्चेत आली आहे.
-
If India wins the World Cup,
— Rekha Boj (@rekha_boj) November 15, 2023
I will streak on Visakhapatnam beach.
India World Cup కొడితే, వైజాగ్ బీచ్ లో streaking చేస్తా...
तेलगू अभिनेत्री रेखा बोजच्या वक्तव्यावरून खळबळ उडाली : रेखा बोजनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'भारत जिंकला तर तिचे कपडे ती उतरवणार' अशी तिनं घोषणा केली आहे. रेखानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'जर भारतानं हा विश्वचषक जिंकला तर मी विझाग बीचवर कपड्यांशिवाय पळेन. ऑल द बेस्ट टीम इंडिया'. तिच्या या वादग्रस्त पोस्टमुळं लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. तिच्या पोस्टवर चांगलाच कमेंटचा पूर आला आहे. पोस्टवर अनेकजण कमेंट करून तिच्यावर टीका करत आहेत.
यूजर्सनं केलं ट्रोल : कमेंट करताना एका यूजरनं लिहिलं की, ''भारत नेहमीच जिंकेल, तुम्ही तुमचे अकाउंट बंद करा.'' तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं की, ''तुला लाज वाटली पाहिजे, एक मुलगी असून तू अशा गोष्टी बोलत आहेस.'' आणखी एकानं लिहिलं, ''या बाईची मानसिक स्थिती चांगली नाही''. अनेकजण तिच्या पोस्टवर कमेंट करून तिची खिल्ली उडवत आहेत. हा सामना पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स अहमदाबादला पोहोचले आहेत. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, उर्वशी रौतेला यांनी देखील हजेरी लावली आहे. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही भारतीय संघाला चिअर करत आहे.
हेही वाचा :
