ETV Bharat / entertainment

Imran khan rumoured girlfriend : किर्ती खरबंदाच्या पार्टीत इमरान खान दिसला कथित गर्लफ्रेंडसोबत...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 4:30 PM IST

Imran khan rumoured girlfriend : अभिनेता इमरान खान सध्या प्रसिद्धीझोतात आला आहे. अलीकडेच तो अभिनेत्री किर्ती खरबंदा हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत दिसला होता. त्यामुळे त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चेला उधाण आलं आहे.

Imran khan rumoured girlfriend
इमरान खानची कथित गर्लफ्रेंड

मुंबई - Imran khan rumoured girlfriend : अलीकडेच अभिनेत्री किर्ती खरबंदानं तिचा 29 ऑक्टोबर 2023 रोजी वाढदिवस साजरा केला. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली होती. दरम्यान या पार्टीला इमरान खान आणि त्याची कथित गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनसह पार्टीत उपस्थित होता. पार्टीत दोघांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. इमराननं लेखाशी आपले नाते अधिकृत केले असल्याच्या, सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. इमरान खाननं 2008 मध्ये 'जाने तू... या जाने ना' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच्या या पहिल्याचं चित्रपटातून त्यानं चाहत्यांच्या मनात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं होतं. त्यानंतर त्यानं किडनॅप, मेरे ब्रदर की दुल्हन, आय हेट लव स्टोरीज असा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्याला पाहिजे तसे यश मिळालं नाही. 2015 मध्ये 'कट्टी बट्टी' चित्रपटात काम केल्यानंतर त्यानं चित्रपटांमधून ब्रेक घेतला.

इमरान खान झळकला गर्लफ्रेंडसोबत : इमरान खान सध्या लाइमलाइटपासून दूर आहे, मात्र कधी कधी तो आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. इमरानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर, 2019 मध्ये तो त्याची एक्स पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळा झाला. दरम्यान तो लेखा वॉशिंग्टनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. हे लव्हबर्ड्स किर्ती खरबंदाच्या वाढदिवसाच्या पार्टीत इंजॉय करताना दिसले. 30 ऑक्टोबर 2023 रोजी, किर्ती खरबंदानं तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं.

पार्टीत सेलिब्रिटींनी लावली हजेरी : या पार्टीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पार्टीमध्ये इमराननं काळ्या रंगाची टी-शर्ट आणि राखाडी पॅन्ट परिधान केला होता. यासोबत त्यानं पांढरे स्नीकर्स घातले होते. दुसरीकडे लेखानं फ्लोय गाऊनसह श्रग परिधान केला होता. यावर तिनं लाईट मेकअप केला होता. किर्तीच्या पार्टीला पुलकित सम्राट, क्रिती सेनॉन, सुनील शेट्टी, तिची मुलगी अथिया शेट्टी, रिचा चढ्ढा आणि तिचा पती अली फजल असे अनेक सेलिब्रिटी आले होते. या बर्थडे पार्टीसाठी किर्तीनं गुलाबी रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

हेही वाचा :

  1. 12th fail Movie: संजय दत्त आणि फरहान अख्तर यांनी विक्रांत मॅसी स्टारर 'ट्वेल्थ फेल'चं केलं कौतुक ; शेअर केली पोस्ट...
  2. Dhanush in Illaiyaraaja biopic : इलाईराजा यांच्या बायोपिकमध्ये झळकणार साऊथचा सुपरस्टार धनुष
  3. Shah Rukh Khan birthday: शाहरुखच्या वाढदिवशी होणार जंगी सेलेब्रिशन; सलमान, दीपिका, आलियासह होणार स्टार स्टडेड पार्टी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.