ETV Bharat / entertainment

Krrish 4 on floors soon : हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता ! क्रिश 4 ची स्क्रिप्ट पूर्ण, शूटिंगची तयारी सुरू !!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 4:13 PM IST

Krrish 4 on floors soon : हृतिक रोशनच्या 'क्रिश' या पहिल्या सुपरहिरो फ्रँचायझीच्या चौथ्या भागाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्यासाठी हृतिकनं नवीन अपडेट दिली आहे. चित्रपटाचं कथानक पूर्ण झालं आहे. चित्रपटासाठीच्या लोकेशन्सचा शोध सुरू करण्यात आला असून प्रत्यक्ष शूटिंगला फेब्रुवारी 2024 मध्ये सुरुवात केली जाईल.

Krrish 4 on floors soon
हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता

मुंबई - Krrish 4 on floors soon : हृतिक रोशनच्या क्रिश चित्रपटाचं तुम्ही चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाच बातमी आहे. क्रिश या यशस्वी सुपरहिरो फ्रँचायजीचा चौथा भाग येणार यावर शिक्का मोर्तब झालंय. हृतिकनं या चित्रपटाची स्क्रिप्ट निश्चित केली आहे. दीर्घ काळानंतर या चित्रपटाची निर्मिती होणार असल्यामुळे कथेतील बारकाव्यांवर कसून नजर टाकण्यात आली आहे.

हृतिकने क्रिश 4 ची संपू्र्ण स्क्रिप्ट डोळ्या खालून घातली आहे. यासाठी त्यानं भारतातील पहिल्या सुपरहिरो फ्रँचायझीच्या अपडेटची खूप दिवसांपासून वाट पाहत असलेल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काही बदल केले आहेत. हृतिक आता क्रिश 4 चे शूटिंग फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सुरू करण्याची तयारी करत आहे. या भूमिकासाठी त्याला शरीरयष्ठीत काही बदल करावे लागणार आहेत. यासाठीची तयारीही तो करत आहे.

शूटिंग लोकेशनच्या बाबतीत प्रॉडक्शन टीम विविध आंतरराष्ट्रीय स्थळांचा विचार करत आहे.याबबतचा तपशील ठरल्यानंतर चित्रपटाच्या बजेटवर काम सुरू होईल. सिंगापूरमध्ये शुटिंग करण्यावरही टीमचा भर असल्याचं समजतंय. जगातील सर्वोत्तम लोकेशन्सवर शुटिंग करण्याचा टीमचा भर आहे. क्रिश, कोइ मिल गया या चित्रपटानं क्रिश फिल्म फ्रँचायझीने सुरुवात केली होती. 8 ऑगस्ट रोजी या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली. एका विशेष दिव्यांग मुलाची कथा असलेल्या या हृदयस्पर्शी चित्रपटात जादु हा एलियन्स भेटीस येतो आणि त्याचं जीवन बदलून जातं. ही कथा अबालवृद्धांच्या पसंतीस उतरली होती आणि हृतिकला सुपरहिरोची ओळख मिळाली होती.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास क्रिश फ्रँचायझीमध्ये पुन्हा सामील होण्याची दाट शक्यता आहे. प्रीती झिंटा परत येण्याची शक्यता नसल्यामुळे चित्रपट निर्माते प्रियांकाची भूमिका पुन्हा साकारण्यासाठी सक्रियपणे पाठपुरावा करत आहेत. क्रिश फ्रँचायझीमध्ये प्रियांका आणि हृतिकला परत पाहणे मनोरंजक असेल. परंतु हॉलिवूडमध्ये खूप बिझी झालेली प्रियांका यासाठी सवड काढते का पाहणं औत्सुक्याचं असेल. क्रिशचा चौथा भाग पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांना ही नवीन अपडेट निश्चितच दिलासा देणारी ठरु शकेल.

हेही वाचा -

1. 12th Fail Movie: संजय दत्त आणि फरहान अख्तर यांनी विक्रांत मॅसी स्टारर 'ट्वेल्थ फेल'चं केलं कौतुक ; शेअर केली पोस्ट...

2. Dhanush In Illaiyaraaja Biopic : इलाईराजा यांच्या बायोपिकमध्ये झळकणार साऊथचा सुपरस्टार धनुष

3. Short And Sweet Movie : 'शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे आई बाबा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.