ETV Bharat / entertainment

Fighters schedule packs up in Italy: हृतिक रोशन आणि दीपिकाचा एरियल ॲक्शन थ्रीलर 'फायटर'चे इटलीतील शेड्युल पॅकअप

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 12:40 PM IST

Fighters schedule packs up in Italy: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी 'फायटर' चित्रपटाचे इटलीतील शुटिंग शेड्यूल पॅकअप झालंय. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने ही माहिती चाहत्यांना कळवली आहे. कलाकारांसोबतचा सेटवरील एक फोटोही त्यानं शेअर केलाय.

Fighters schedule packs up in Italy
फायटर पॅकपनंतर हृतिकने क्लिक केलेला फोटो

रोम ( इटली ) - Fighters schedule packs up in Italy: अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी 'फायटर' चित्रपटाचे इटलीतील शुटिंग शेड्यूल पूर्ण झालं आहे. बुधवारी रात्री दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने हे अपडेट शेअर केले आणि चाहत्यांना 'फायटर' चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झाल्याचं कळवलंय. 'फायटर' चित्रपटची टीम गेल्या काही काळापासून इटलीत काम करत आहे. अलिकडेच शूटिंगच्या लोकेशनचा एक फोटो ऑनलाइन समोर आला आहे. हृतिकने क्लिक केलेल्या या सेल्फीमध्ये दीपिका, सिद्धार्थ आणि त्याची पत्नी ममता भाटिया आनंद आणि नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिस दिसत आहेत.

Fighters schedule packs up in Italy
सिद्धार्थ आनंदने शेअर केलेली पोस्ट

हृतिकने क्लिक केलेला हा फोटो अभिनेता अरफीन खानने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये सिद्धार्थ आनंद त्याच्या शेजारी दिसतोय. अरफीननं फोटोला कॅप्शन देताना लिहिलं होत, 'ॲक्शनमध्ये फायटर्स...भारी लोक लोक, अप्रतिम शुटिंग.' 'फायटर' हा भारतातील पहिला एरियल ॲक्शन चित्रपट असल्याचं म्हटलं जातंय. यापूर्वी फायटर चित्रपटाच्या निर्मात्यांनी हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर असलेले मोशन पोस्टर शेअर केलं होतं.

Fighters schedule packs up in Italy
फायटर पॅकपनंतर हृतिकने क्लिक केलेला फोटो

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने २०२१ मध्येच या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यावेळी पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं होतं, 'माझे आवडते स्टार्स हृतिक आणि दीपिका यांना पहिल्यांदाच भारतीय आणि जगातील प्रेक्षकांसाठी एकत्र आणण्याचा हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक क्षणांपैकी एक आहे. याची सुरुवात करताना मला खूप आनंद होत आहे. MARFLIX या भारतातील पहिल्या ॲक्शन चित्रपट निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रॉडक्शन हाऊसचा प्रवास मी माझी पत्नी ममता आनंदसोबत सुरू करतोय. या प्रवासाला हृतिकसोबत सुरुवात करणं खास आहे. म सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यानं मला पाहिलंय. त्यानंतर त्याच्या दोन चित्रपटांचा दिग्दर्शकच नाही तर माझे प्रॉडक्शन हाऊसही सुरू करत आहे.' अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही फायटर चित्रपटामध्ये भूमिका आहेत. हा महत्त्वकांक्षी चित्रपट 2 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

दरम्यान दीपिका पदुकोण आगामी पॅन-इंडियाॲक्शन थ्रिलर चित्रपट 'कल्की 2898 एडी' मध्ये सुपरस्टार प्रभास आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. त्यासोबतच हृतिक रोशन हा ज्युनियर एनटीआरसोबत ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'वॉर 2' मध्ये झळकणार आहे.

हेही वाचा -

1. Aamir Khan : आमिर खानचा व्हिडिओ झाला इंस्टाग्रामवर व्हायरल; पहा व्हिडिओ...

2. The Archies Film: सुहाना खान, खुशी कपूरच्या 'द आर्चीज'ची नवीन पोस्टर्स लॉन्च

3. Ar. Rahman : सर्जन्स असोसिएशननं एआर रहमान यांच्यावर केला 'हा' आरोप....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.