ETV Bharat / entertainment

HBD Ayushmann Khurrana: 'ड्रीम गर्ल 2'मध्ये पूजा बनून आयुष्मान खुरानानं जिंकली लोकांची मनं; वाचा आजच्या या बर्थडे बॉयची रियल कहाणी...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 1:00 PM IST

HBD Ayushmann Khurrana: बॉक्स ऑफिसवर आयुष्मान खुरानाचा नुकताच रिलीज झालेला 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट हिट झाला. 'जवान'ची रुपेरी पडद्यावर क्रेझ असूनही हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान आज आयुष्मानचा वाढदिवस आहे. या खास दिवसानिमित्त त्याच्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊया...

HBD Ayushmann Khurrana
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्मान खुराना

मुंबई HBD Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना त्याच्या 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आयुष्मान आज 39 वर्षांचा झाला आहे. त्याला बॉलिवूडमध्ये येऊन 11 वर्षे झाली असून तो आपल्या अभिनयानं आणि आवाजानं चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आयुष्मान खुरानाचा जन्म चंदीगडमध्ये झाला. आयुष्मानचं बालपणीचं नाव निशांत खुराना होतं. त्यानंतर त्यानं त्याचं नाव बदलून आयुष्मान खुराना ठेवलं. आयुष्माननं इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. याशिवाय त्यानं पत्रकारितेचाही अभ्यास केला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयुष्मान खुराना आरजे झाला.

आयुष्मान खुरानाच्या आवाजानं केली जादू : आयुष्माननं दिल्लीतील बिग एफएममध्ये काम करायला सुरुवात केली. जिथे तो 'बिग चाय-मान ना मान में तेरा आयुष्मान' या नावाचा शो होस्ट करत होता. त्यानंतर त्याला एमटीव्हीच्या रियालिटी शोमध्ये 'रोडीज 2'मध्ये संधी मिळाली. या शोचा तो विजेता ठरला. आयुष्मान हा आरजे बनण्याआधी ट्रेनमध्ये गाायचा. तो चंदीगड इंटर सिटी ट्रेनच्या सेकंड क्लासच्या डब्यात प्रवास करायचा आणि आपल्या आवाजानं लोकांवर जादू करायचा. त्यानंतर आयुष्मानला 2012 मध्ये शूजित सरकार दिग्दर्शित 'विकी डोनर' चित्रपटामध्ये काम मिळालं. या चित्रपटाद्वारे त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटामध्ये त्यानं चांगला अभिनय केला होता.

खऱ्या आयुष्यात स्पर्म डोनर बनला : आयुष्मान खुराना फक्त ऑनस्क्रीन स्पर्म डोनर बनला नाही तर त्यानं खऱ्या आयुष्यातही स्पर्म दान केलं आहे. आयुष्माननं एका इव्हेंटमध्ये खुलासा केला होता की एमटीव्ही 'रोडीज'च्या ऑडिशनदरम्यान त्याला स्पर्म डोनेट करण्याचा टास्क देण्यात आला होता आणि त्यानं हा टास्क पूर्णही केला. टास्क जिंकण्यासाठी आयुष्माननं अलाहाबादमध्ये स्पर्म दान केलं होतं.

'ड्रीम गर्ल' चित्रपटाद्वारे 'पूजा' बनून जिंकली चाहत्यांची मनं : आयुष्मान खुरानानं चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर बनलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'विकी डोनर', 'शुभ मंगल सावधान', 'बरेली की बर्फी', 'मेरी प्यारी बिंदू', 'बधाई हो', 'अंधाधुंद', 'दम लगाके हैसा' आणि 'ड्रीम गर्ल' या सर्व कॉमेडी चित्रपटातून त्यानं चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. नुकताच त्याच्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटाचा 'ड्रीम गर्ल 2' सीक्वल रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये तो 'पूजा'च्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटानंतर आयुष्मान खुरानाच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

हेही वाचा :

  1. Tiger shroff and janhvi kapoor : टायगर श्रॉफ आणि जान्हवी कपूर झळकणार दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या आगामी 'रेम्बो' चित्रपटात...
  2. kangana ranaut and PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या ट्रोल झालेल्या व्हिडिओवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली....
  3. Salaar Movie : प्रभासच्या 'सालार' चित्रपटासाठी आणखी वाट पाहावी लागणार, २८ ची रिलीज डेट हुकणार...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.