ETV Bharat / entertainment

Ganapath Trailer out : टायगर श्रॉफ क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ'चा ट्रेलर प्रदर्शित, पहा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन ड्रामा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 3:45 PM IST

Ganapath Trailer out
गणपतचा ट्रेलर रिलीज

Ganapath Trailer OUT : टायगर श्रॉफ क्रिती सेनॉनचा 'गणपथ' चित्रपटाचा ट्रेलर आज 9ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहामध्ये दाखल होणार आहे.

मुंबई - Ganapath Trailer OUT : टायगर श्रॉफ, क्रिती सेनॉन आणि अमिताभ बच्चन स्टारर आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'गणपथ: अ हिरो इज बॉर्न'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. विकास बहलच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट अनेक दिवसापासून चाहते पाहत होते. दरम्यान काही दिवसापूर्वी 'गणपथ' चित्रपटाचा टीझर 29 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा टीझर चाहत्यांना खूप आवडला होता. या चित्रपटाचा टीझर हा 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणास्तव याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

'गणपथ'चा ट्रेलर प्रदर्शित : 'गणपत' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन अ‍ॅक्शन पाहायला मिळत आहे. याशिवाय या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चनची झलक देखील दाखविण्यात आली आहे. 'गणपथ'चा ट्रेलर हा 2 मिनिट 28 सेंकदाचा आहे. या चित्रपटाची कहाणी ही 2070 मध्ये सुरू होत आहे. ट्रेलरमध्ये टायगरचे दोन रूप पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. हा चित्रपट या दसऱ्याला म्हणजेच 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'गणपथ- ए हिरो इज बॉर्न' हा एक उत्कृष्ट हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन चित्रपट आहे. 2070 मध्ये सुरू होत असलेल्या या चित्रपटामध्ये यांत्रिकीकरण आणि मानवांमधील युद्ध दिसत आहे. हा चित्रपट या काळाच्या खूप पुढं असणार आहे. 'गणपथ'च्या एका सीनमध्ये अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्याच्या फ्लॉप चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या लूकमध्ये दिसत आहेत.

वर्कफ्रंट : जॅकी भगनानी, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत जगभरातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 'गणपथ' व्यतिरिक्त टायगर अक्षय कुमारसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट अब्बास जफर दिग्दर्शित असून 2024 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, क्रिती सेनॉन 'द क्रू'मध्ये करीना कपूर खान, तब्बू आणि पंजाबी स्टार दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. याशिवाय क्रिती ही काजोलसोबत 'दो पत्ती'मध्येही दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Akshay Kumar :ट्रोल झालेल्या अक्षय कुमारनं तोडला पान मसाला कंपनीचा करार
  2. Dhak Dhak trailer out: 'धक धक'चा कडक ट्रेलर रिलीज, महिलांचं जीवन बदलणारा प्रवास सुरू
  3. Amazon and Flipkart Big Sale 2023 :ऑनलाईन शॉपिंगवर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर साइटस् देणार 'इतकी' सूट ; महाऑफर सुरू...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.