ETV Bharat / entertainment

'डंकी' ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी ट्रेलर, 'सालार'चाही मोडला विक्रम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 12:21 PM IST

Dunki Movie : शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'डंकी'चा ट्रेलर सर्वाधिक पाहिला जाणारा हिंदी ट्रेलर ठरला आहे. 'डंकी'नं 24 तासांत 59 दशलक्ष व्ह्यूजसह 'सालार'चा रेकॉर्ड मोडला आहे. आत्तापर्यंत 'डंकी'चा ट्रेलर 66 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.

Dunki Movie
डंकी चित्रपट

मुंबई - Dunki Movie : अभिनेता शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटचा ट्रेलर हा 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसतंय. दरम्यान 24 तासांत यूट्यूबवर सर्वाधिक हा ट्रेलर पाहिला गेला आहे. या ट्रेलरनं एक विक्रम केला आहे. शाहरुख खानच्या चाहत्यासाठी हे वर्ष खास आहे. किंग खानचे लागोपाठ दोन चित्रपट हिट ठरले. आता शाहरुखचा 'डंकी' चित्रपट रुपेरी पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुख खाननं हे वर्ष हिंदी सिनेप्रेमींसाठी खास बनवले आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी', या वर्षी ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'डंकी'च्या ट्रेलरनं केला नवा विक्रम : या चित्रपटाचा हा ट्रेलर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. या ट्रेलरला 6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत, यूट्यूबवर 62 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या कामगिरीनं 'डंकी'नं 'सालार: सीझफायर'च्या हिंदी ट्रेलरला मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर 'डंकी'सोबत टक्कर देणारा प्रभास स्टारर चित्रपटाला यूट्यूबवर 24 तासांत 53.75 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. 24 तासात यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज असलेला 'आदिपुरुष' हा टॉप तिसरा हिंदी ट्रेलर आहे. सर्वाधिक पाहिले गेलेले हिंदी ट्रेलर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे आहेत, ज्यात दोन प्रभास आणि दोन रणबीर कपूर अभिनीत सिनेमा आहेत.

'डंकी' चित्रपटाची स्टार कास्ट : 'डंकी' चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि तापसी पन्नू व्यतिरिक्त विकी कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची कहाणी 5 मित्रांवर आधारित आहे, ज्यांना इंग्लंडला जायचं आहे. हे मित्र परदेशात जाण्यासाठी खूप धडपड करतात. शाहरुख खाननं आपल्या मित्रांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे. चित्रपटाची पूर्ण कहाणी याच विषयाभोवती फिरते. 'डंकी फ्लाइट' बेकायदेशीर इमिग्रेशन तंत्रावर आधारित असल्यानं हा चित्रपट खूप वेगळा असणार असल्याचं असं दिसत आहे. या चित्रपटाकडून किंग खानला खूप अपेक्षा आहेत. याशिवाय राजकुमार हिराणीसोबतचा शाहरुख खानचा हा पहिला चित्रपट आहे.

हेही वाचा :

  1. 'केजीएफ' स्टार यशच्या आगामी चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री
  2. बॉबी देओल अभिनीत इराणी 'जमाल कुडू' गाण्याचा ऑडिओ ट्रॅक झाला रिलीज
  3. ' द आर्चिज' अतिशय सुंदर कलाकृती : करण जोहर, कतरिनासह सेलेब्रिटींचा अभिप्राय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.