ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोण झाली मुंबई विमानतळवर स्पॉट, व्हिडिओ व्हायरल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 4:39 PM IST

Deepika Padukone's Airport Look: दीपिका पदुकोण आज बुधवारी सकाळी विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी ती स्टायलिश लूकमध्ये दिसली. तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Deepika Padukones Airport Look
दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक

मुंबई - Deepika Padukone's Airport Look : अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या फॅशनमुळं नेहमीच चर्चेत असते. ती बुधवारी पहाटे मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी, दीपिका तिच्या विंटर लूकमध्ये होती. तिच्या या लूकची सध्या खूप सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी दीपिका परदेशात रवाना झाल्याचं बोललं जात आहे. पापाराझीनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दीपिका पदुकोणचा स्टायलिश एअरपोर्ट लूकचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, दीपिका कारमधून बाहेर पडताना दिसत आहे.

दीपिका पदुकोणचा एयरपोर्ट लूक : दीपिकानं गुलाबी रंगाचे लोकरीचे जाकीट आणि पांढर्‍या रंगाचे हाय-नेक टॉपसह काळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केला आहे. तिनं यावर तपकिरी रंगाचे बूट घातले आहेत. याशिवाय तिच्या हातात तपकिरी रंगाची पर्स दिसत आहे. तिनं या लूकवर आपले केस मोकळे सोडले आहे. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं यावर सनग्लास लावला आहे. दीपिकाच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, तिचं लूक खूप सुंदर आहे' त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं 'दीपिका ही नेहमीच सुंदर दिसते तिचा एयरपोर्ट लूक छान आहे'. आणखी एका चाहत्यानं या पोस्टवर लिहलं, मी तिचा खूप मोठा चाहता आहे, दीपिका लव्ह यू'. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

दीपिका पदुकोणचा वर्क फ्रंट : दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अखेर शाहरुख खानसोबत 'जवान'मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिनं ऐश्वर्या राठोडची भूमिका साकारली होती. ती लवकरच अमिताभ बच्चन आणि प्रभाससोबत 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती सिद्धार्थ आनंदच्या 'फायटर'मध्ये झळकेल. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत हृतिक रोशन आहे. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती या चित्रपटात अजय देवगणच्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्रामच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो झाले व्हायरल
  2. अ‍ॅनिमल'च्या बापचा 'अ‍ॅनिमल'च्या शत्रूसोबत फोटो, अनिल कपूरनं दिलं मजेशीर कॅप्शन
  3. चित्रपट फ्लॉपची जबाबदारी माझी तर हिटचं श्रेय टीमला जातं : सलमान खान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.