ETV Bharat / entertainment

Jawan Box Office Collection day 8 : 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर छापत आहे नोटा....

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 12:10 PM IST

Jawan Box Office Collection day 8 : 'जवान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटानं देशांतर्गत 368.38 कोटीची कमाई केली आहे. दरम्यान या चित्रपटानं आठव्या दिवशी किती कमाई केली याबद्दल जाणून घ्या...

Jawan Box Office Collection day 8
जवान बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8

मुंबई - Jawan Box Office Collection day 8 : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट पहिल्या दिवसापासूनच खूप कमाई करत आहे. आतापर्यंत 'जवान' चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. किंग खानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. अवघ्या सात दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 'जवान'नं 350 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप झपाट्यानं कमाई केली आहे. याशिवाय 'जवान' हा जगभरात खूप जबरदस्त कमाई करत आहे. 'जवान' चित्रपट सध्या रिलीजच्या आठव्या दिवसात आहे. हा चित्रपट आठव्या दिवशी किती कमाई करू शकतो हे आपण जाणून घेऊया...

'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सचनिल्कच्या रिपोर्टनुसार 'जवान'नं पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये 75 कोटी, दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटी, पाचव्या दिवशी 30.5 कोटी आणि सहाव्या दिवशी 26 कोटी आणि सातव्या दिवशी 23.3 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 368.38 कोटी झालं आहे. हा चित्रपट आठव्या दिवशी 19.36 कोटीची कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 387.74 होईल. या चित्रपटाची जगभरातील कमाई 621 कोटीवर पोहचली आहे.

'जवान' बॉक्स ऑफिस कलेक्शन

  • पहिला दिवस ७५ कोटी
  • दुसरा दिवस ५३.२३ कोटी
  • तिसरा दिवस 77.83
  • चौथा दिवस 80.1 कोटी
  • पाचवा दिवस 32.92
  • सहावा दिवस 26 कोटी
  • सातवा दिवस 23.3 कोटी
  • आठवा दिवस 19.36 कोटी * कमाई करू शकेल.

'जवान'चं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 387.74 कोटी

'जवान' चित्रपटामधील स्टारकास्ट : 'जवान' चित्रपटामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा आणि विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, प्रियामणी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अ‍ॅटली यांनी केले आहे. 'जवान' हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट लवकरच जगभरात 1000 कोटीची कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा :

  1. Salaar Movie : प्रभासच्या 'सालार' चित्रपटासाठी आणखी वाट पाहावी लागणार, २८ ची रिलीज डेट हुकणार...
  2. Singham 3 vs Pushpa 2 : अजय देवगणची माघार? 'पुष्पा द रूल'साठी 'सिंघम ३' रिलीज लांबणीवर... वाचा काय आहे प्रकरण
  3. Vijay Thalapathy Film Leo : साऊथ सुपरस्टार विजय थलपथीचा 'लिओ' चित्रपट यूकेमध्ये अनकट होईल रिलीज...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.