ETV Bharat / entertainment

BBD Box Office collection day 22 : 'बाईपण भारी देवा'ची २२ व्या दिवशीही छप्परफाड कमाई सुरूच !

author img

By

Published : Jul 22, 2023, 12:10 PM IST

Updated : Jul 22, 2023, 3:21 PM IST

'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने २२व्या दिवशी सुद्धा रूपेरी पडद्यावर चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटातील सर्वच गाणी सोशल मीडियावर हिट झाली आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपट आजही रूपेरी पडद्यावर वर्चस्व गाजवत आहे.

Baipan bhari deva
बाईपण भारी देवा

मुंबई : 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २२ दिवस झाले आहेत तरीही हा चित्रपट रूपेरी पडद्यावर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. 'बाईपण भारी देवा' चित्रपटात शेवटी दाखवण्यात आलेले 'मंगळागौर' गाणे हिट ठरले आहे. या चित्रपटाने २२ व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १.२५ कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले तरी शुक्रवारी 'बाईपण भारी देवा'ने १९.९५ % व्यवसाय केला. या चित्रपटाला पाहण्यासाठी अनेक महिला गाव खेड्या शहराकडे येत आहे.

चित्रपटामधील गाणे : 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील सर्वच गाणी सोशल मीडियावर हिट झाली आहेत. याशिवाय चित्रपटामधील गाणी आणि काही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा चित्रपट फक्त ५ कोटीच्या बजेटमध्ये बनलेला आहे, मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चिक्कार कमाई केली. त्यामुळे सर्व मराठी चित्रपटसृष्टीतून या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. हा चित्रपट भारतात नाही तर जगभरात ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह ५ देशात कमाई करत आहे. शिवाय महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशातील काही शहरे व हैदराबादसारख्या शहरात चित्रपटाचे आजही शो हाऊसफुल्ल आहेत.

चित्रपटाची शुटिंग : या चित्रपटाची शुटिंग १ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू झाली होती. चित्रपटाचे शूट सुरू असतानाच कोरोनाची लाट भारतात आली, त्यानंतर चित्रपटाची शुटिंग ठप्प पडले. मात्र, कोरोनाच्या काळात काही दिवस या चित्रपटाची शुटिंग जारी ठेवण्यात आले. खूप जोखीम असतानाही कलाकारांनी दिग्दर्शकाला साथ दिल्यानंतर ही कलाकृती तयार झाली. मात्र कोरोनानंतर याचे प्रदर्शन लांबणीवर पडले. याच्या प्रददर्शनात अनेक अडथळे आल्यानंतर हा सिनेमा रिलीज झाला आणि त्यानंतरचा घडलेला इतिहास आपल्या सर्वांच्या समोर आहे.

हेही वाचा :

  1. BBD Box Office : बाईपण बॉक्स ऑफिसवर बेलगाम, चौथ्या आठवड्यातही हाऊसफुल्ल
  2. Atlee Kumar praised Bawal : जान्हवी कपूर आणि वरुण धवनच्या 'बवाल'चे दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारने केल कौतुक
  3. Shiney Ahuja Passport Application: जामिनावर असलेला बॉलिवूड अभिनेता शायनी आहुजा निघाला परदेशी; पासपोर्टसाठी उच्च न्यायालयात धाव
Last Updated :Jul 22, 2023, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.