ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'चा जगभरात 500 कोटीचा टप्पा पार, देशांतर्गत झाली 300 कोटीची कमाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 12:31 PM IST

Animal Box Office Collection Day 7: वर्षातील सर्वात प्रतीक्षित चित्रपट 'अ‍ॅनिमल'नं पहिल्या सहा दिवसात बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. या चित्रपटानं देशांतर्गत 300 कोटीचा आकडा पार केला आहे. याशिवाय जगभरात 'अ‍ॅनिमल'नं 500 कोटीचा टप्पा पार केला आहे. आता रिलीजच्या सातव्या दिवशी हा चित्रपट किती कोटीची कमाई करेल हे जाणून घेऊया.

Animal Box Office Collection Day 7
अ‍ॅनिमल बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 7

मुंबई - Animal Box Office Collection Day 7 : अभिनेता रणबीर कपूरचा नुकताच रिलीज झालेला 'अ‍ॅनिमल' चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच हा चित्रपट दररोज अनेक विक्रम मोडत आहे. रणबीर कपूरचा हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये राज्य करत आहे. 'अ‍ॅनिमल' पाहण्यासाठी अनेकजण चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत असून. या चित्रपटाचे शो सध्या हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत.

'अ‍ॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'अ‍ॅनिमल'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 63.8 कोटी, दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी पाचव्या दिवशी 37.47 आणि सहाव्या दिवशी 29.61 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 312.96 कोटी झालं आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या सातव्या दिवसात आहे. रिलीजच्या सातव्या दिवशी हा चित्रपट 2.92 कोटीची कमाई करू शकतो. यानंतर या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 315.49 कोटीवर पोहोचेल. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट प्रचंड वेगानं कमाई करत आहे. 'अ‍ॅनिमल' 'जवान' आणि 'पठाण' नंतरचा तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला. 'अ‍ॅनिमल'नं देशांतर्गत 6 दिवसात 300 कोटींचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. 'अ‍ॅनिमल'चं जगभरातील कलेक्शन पाहिल्यास या चित्रपटानं 500 कोटींची कमाई केली आहे.

'अ‍ॅनिमल'चं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन

शुक्रवार पहिला दिवस 63.8 कोटी

शनिवार दुसरा दिवस ६६.२७ कोटी

रविवार तिसरा दिवस 71.46 कोटी

सोमवार चौथा दिवस 43.96 कोटी

मंगळवार पाचवा दिवस 37.47 कोटी

बुधवार सहावा दिवस 29.61 कोटी

गुरुवार सातवा दिवस 2.92 कोटी कमाई करू शकतो

चित्रपटाचं एकूण कलेक्शन 315.49 कोटी

'अ‍ॅनिमल' चित्रपटानं केली जादू : 'अ‍ॅनिमल' या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना बॉबी देओल, तृप्ती डिमरी, अनिल कपूर, शक्ती कपूर आणि इतर कलाकार खूप जबरदस्त अभिनय केला आहे. हा चित्रपट कमाईमध्ये 'जवान'चं विक्रम तोडेल अशी सध्या अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटामध्ये बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका केली आहे. अनेकांना त्याचं पात्र या चित्रपटामधील आवडलं आहे.

हेही वाचा :

  1. हिमांशी खुराणा आणि असीम रियाझचं वेगवेगळ्या धर्मामुळे झाले ब्रेकअप
  2. 'केजीएफ' स्टार यशच्या आगामी चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री
  3. बॉबी देओल अभिनीत इराणी 'जमाल कुडू' गाण्याचा ऑडिओ ट्रॅक झाला रिलीज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.