ETV Bharat / entertainment

Ananya security pushes fan : अनन्या पांडेच्या बॉडी गार्ड्सने फॅनला ढकले, वाचा नंतर काय घडले

author img

By

Published : Jul 15, 2023, 7:52 PM IST

अनन्या पांडेशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याला सुरक्षा रक्षकांनी ढकलले. मात्र अनन्याने त्याला सेल्फी काढण्यास परवानगी दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. हा जुन्हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

Ananya security pushes fan
अनन्याच्या बॉडी गार्ड्सने फॅनला ढकले

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच तिच्या चाहत्यांच्या गराड्यात असते. तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांमध्ये चढा ओढ लागलेली असते. अनन्या काही दिवसापूर्वी मुंबईत चाहत्यांच्या गर्दीत सेल्फीसाठी पोज देत असताना दिसली. त्यानंतर तिच्या सुरक्षा रक्षकांनी चाहत्यांना ढकलून दूर केले, परंतु अनन्याने स्वतःहून त्या चाहत्याला सेल्फीसाठी परवानगी दिली. काही दिवसापूर्वी घडलेल्या या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चाहत्यांसोबत सेल्फीसाठी पोज देत असताना या व्हिडिओत अनन्या दिसत आहे. हे सर्व होत असताना एक व्यक्ती तिच्या मागून येतो आणि खूच जवळ उभा राहतो. हे पाहताच अनन्याच्या सुरक्षा रक्षाकांनी त्याला दूर उभे राहण्यास सांगितले आणि नंतर त्याला ढकलूनही दिले. परंतु हे अनन्याच्या लक्षात येताच त्या चाहत्याला तिने सेल्फी घेण्यास परवानगी दिली.

काही नेटिझन्सनी सुरक्षा रक्षकांच्या या वागण्यावर आक्षेप घेतला. परंतु अनन्याच्या इतक्या जवळ पोहोचलेल्या त्या चाहत्याचे वागणे पाहून सुरक्षा रक्षकांनी घेतलेली काळजी योग्य असल्याचेही काही युजर्सनी म्हटले आहे. अनेकांनी या बॉडीगार्ड्सचे कौतुकही केले आहे.

अलिकडेच अनन्याने इंस्टाग्रामवर स्टोरीजवर फोटो शेअर केला होता. ती स्पेनमधील कॉन्सर्टचा आनंद घेत होती. ती आणि सिद्धार्थ रॉय कपूर रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बऱ्याचदा रंगत असतात. या पार्श्वभूमीवर अनन्यासोबत सिद्धार्थही स्पेनमध्ये दिसल्याने टेडिंगच्या चर्चेला पुन्हा उधाण आले होते. क्रिती सेनॉनने आयोजित केलेल्या दिवाळी सेलेब्रिश पार्टीपासून दोघांच्या डेटिंगची चर्चा होत असते. ती अधून मधून एकत्र स्पॉट होतात तेव्हा अशा चर्चेला आणखीन हवा मिळते.

कामाच्या आघाडीवर अनन्या पांडे आगामी 'ड्रीम गर्ल २' मध्ये दिसणार आहे. राज शांडिल्य यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा, परेश रावल आणि अन्नु कपूर यांच्या प्रमुख भूमिका असतील. याशिवाय ती 'खो गये हम कहां' या चित्रपटातही आदर्श गौरव आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत झळकणार आहे.

हेही वाचा -

१. Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन लोकसभा निवडणूक लढवणार?, प्रयागराजमधून तिकिट मिळणार असल्याची चर्चा

२. The battle story of somnath : 'द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ' चित्रपटाची घोषणा, टीझरही झाला प्रदर्शित

३. Ji Karada celebritation : तमन्ना भाटियाचे तिच्या कॉलेजमध्ये उत्स्फुर्त स्वागत, केले 'जी करदा'चे जोरदार सेलिब्रेशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.