Ae Watan Mere Watan teaser: स्वातंत्र्यसैनिक उषा मेहतांच्या बायोपिकमध्ये सारा अली खान, ए वतन मेरे वतन टिझर रिलीज

author img

By

Published : Jan 23, 2023, 10:29 AM IST

Updated : Jan 23, 2023, 11:33 AM IST

Ae Watan Mere Watan teaser

ए वतन मेरे वतनच्या निर्मात्यांनी सोमवारी सारा अली खान स्टारर चित्रपटाचा टीझर लॉन्च केला. कन्नन अय्यर दिग्दर्शित हा चित्रपट 1942 मधील भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथमधून पदार्पण केल्यानंतर प्रथमच ती स्वतःच्या खांद्यावर संपूर्ण चित्रपटाचा भार सांभाळण्यासाठी सज्ज झाली आहे. सारा आगामी ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरने बनवलेल्या या चित्रपटात सारा स्वातंत्र्य चळवळीत गुप्त रोडिओ चालवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सोमवारी निर्मात्यांनी ए वतन मेरे वतनचा टीझर शेअर केला. या चित्रपटात सारा तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच खऱ्या आयुष्यातील नायिकेची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी सारा अली खानने सिम्बा, कुली नंबर 1 आणि अतरंगी रे सारख्या व्यावसायिक चित्रपटात काम करुन चाहत्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. उषा मेहता बायोपिकमध्येही साराच्या गंभीर भूमिका साकारण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाणार आहे.

कसा आहे ए मेरे वतनचा टीझर - ए मेरे वतन चित्रपटाच्या टीझरमध्ये उषा मेहतांच्या भूमिकेत असलेली सारा अली खान घराचे दरवाजा, खिडक्या बंद करते व घाईने रेडिओ प्रसारणाची तयारी करताना दिसते. अखेर थेट प्रसारण सुरू होते. रेडिओ अनाऊन्समेंटमध्ये सारा हिंदीमध्ये म्हणते की, 'इंग्रजांना वाटतंय की त्यांनी चले जाओ आंदोलनाचे डोके दडपून टाकले आहे. परंतु स्वतंत्र आवाज कधीच कैद होत नसते. हा हिंदुस्थानचा आवाज, हिंदुस्थानमधून कुठुनतरी, कुठूनतरी हिंदुस्थानमधून.' हे बोलत असतानाच बाहेरुन दरवाजा जोरजोरात ठोठावला जातो. उषा मेहतांच्या भूमिकेतील सारा अलीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. आपल्याला लक्षात येते की बाहर पोलीस मेहतांना पकडण्यासाठी आले असावेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा टीझर स्वातंत्र्य चळवळीतील एक अज्ञात यशोगाथा प्रेक्षकांसमोर मांडताना दिसतो.

हा चित्रपट एका शूर, सिंह हृदयाच्या स्वातंत्र्यसैनिकाभोवती फिरतो. १९४२ मधील भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कथा बेतलेली आहे. ए वतन मेरे वतन हे सत्य घटनांनी प्रेरित एक थ्रिलर नाट्यमय चित्रपट आहे. दारब फारुकी आणि कन्नन अय्यर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. निर्मात्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ए वतन मेरे वतनचे शूट पूर्ण केले.

करण जोहरच्या एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या वतीने निर्माण करण्यात आलेला हा चित्रपट कन्नन अय्यर यांनी दिग्दर्शित केला आहे. स्ट्रीमिंग जायंट अमेझॉन प्राईम मुव्ही ( Amazon Original Movie ) वर प्राइम सदस्यांसाठी 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये रिलीज झाल्यावर उपलब्ध असेल.

पुढील वर्षासाठी सारा अली खानकडे विविध शैलीतील चित्रपट आहेत जसे की विक्रांत मॅसी विरुद्ध पवन कृपलानीचा गॅसलाइट, लक्ष्मण उतेकरचा विकी कौशल सोबतचा अनटायटल आणि दुसरा ए वतन मेरे वतन. या सर्वांशिवाय तिचा नवा चित्रपट मेट्रो: इन दिनो हा अनुराग बसू आणि आदित्य रॉय कपूरसोबतचा चित्रपटदेखील पाइपलाइनमध्ये आहे.

हेही वाचा -Sheezan Khan Sister : शीझान खानची बहीण फलक नाज रुग्णालयात दाखल; आईची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट

Last Updated :Jan 23, 2023, 11:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.