ETV Bharat / entertainment

Kerala story trends in India : 'द केरळ स्टोरी' ट्रेंडिंगमध्ये ठेवल्याबद्दल अभिनेत्री अदा शर्माने चाहत्यांचे मानले आभार

author img

By

Published : May 11, 2023, 1:43 PM IST

Adah Sharma
अदा शर्मा

'द केरळ स्टोरी'बद्दल वाद असूनही, वादग्रस्त चित्रपट भारतातील ट्रेंडिंग यादीत अव्वल आहे. चित्रपटातील नायकेची भूमिका करणारी अभिनेत्री अदा शर्माने ट्विटरवर चित्रपट 'ट्रेंड' बनवल्याबद्दल तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

मुंबई - सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाविषयी वाद सुरूच आहे. अनेक राजकीय नेत्यानी या चित्रपटाला समर्थन दिले आहे तर काहीजणांनी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत त्याच्यावर टिका केली आहे. एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचे ठरविले आहे. आता हा चित्रपट 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अदा शर्मानं याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने प्रेक्षकांना धन्यवाद म्हटले आहे. पुढे तिने लिहले की, 'आमचा चित्रपट पाहिल्याबद्दल धन्यवाद, तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि ट्रेंड केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या अभिनयावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर तिने सांगतले की, या आठवड्याच्या शेवटी १२ मे रोजी द केरळ स्टोरी चित्रपट ३७ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • Thank you to all the crores of you who are going to watch our film,thank you for making it trend,thank you for loving my performance.This weekend the 12th #TheKeralaStory releases internationally in 37 countries (or more) ❤️❤️ #adahsharma pic.twitter.com/XiVnvBIQPw

    — Adah Sharma (@adah_sharma) May 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

द केरळ स्टोरी : अदाला एका मुलाखतीमध्ये विचारले गेले की, देशाच्या राजकीय परिस्थितीमध्ये कोणत्या संख्येमुळे व्यत्यय निर्माण झाला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'कथा खरोखरच भयानक आहे. लोक याला अपप्रचार म्हणत आहेत. हरवलेल्या मुलींच्या संख्येबद्दल विचार केला पाहिजे. वस्तुस्थिती भयावह आहे. चित्रपटाच्या विषयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करताना, ती म्हटले की, एकदा चित्रपट पाहिल्यावर तुम्ही आकड्यांवर चर्चा करणार नाही.' अदाने २००८ मध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर, तिने हसी तो फसी, कमांडो 2 आणि कमांडो 3 सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. दरम्यान, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने शांतता राखण्यासाठी या चित्रपटावर बंदी घातली आहे.

चित्रपटावर बंदी : राज्यात द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टळल्या पाहिजे, म्हणून या चित्रपटावर बंदी घालणारे पश्चिम बंगाल हे पहिले राज्य बनले आहे. भाजपशासित मध्य प्रदेशात चित्रपट करमुक्त करण्यात आला असतानाही या चित्रपटाभोवती राजकीय आक्रोश सुरू आहे. चित्रपटात अदा शर्मा व्यतिरिक्त योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहे. केरळमधील 32,000 महिला बेपत्ता झाल्या आणि दहशतवादी गट ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा चित्रपटात केला गेला, यामुळेच वाद निर्माण झाला होता. या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, ट्रेलरमधील वादग्रस्त भाग हा वगळण्यात आला. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात तीन महिला या दहशतवादी गट ISIS मध्ये सामील झाल्या आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडले हे चित्रपटात दाखविले गेले आहे. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 57.62 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर शतक पूर्ण करेल अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Virat Kohli Pokes Fun : विराट कोहलीचा मौके पर छक्का, अनुष्कासह पापाराझींमध्ये खळखळाट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.