ETV Bharat / crime

...म्हणून मुलाने स्वतःच्या बापावर झाडल्या गोळ्या

author img

By

Published : May 20, 2021, 8:55 PM IST

Updated : May 20, 2021, 9:26 PM IST

आष्टी शहरात दारुच्या नशेत आईला मारहाण करत बंदुकीचे धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सेवानिवृत्त सैनिक वडिलांवर मुलाने दारुच्या नशेत गोळीबार केला. यात सेवानिवृत्त सैनिकाच्या पोटात गोळी लागली असून स्वतः मुलाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

gun
gun

आष्टी (बीड) - शहरातील गणपती मंदिराजवळ सेवानिवृत्त सैनिकाच्या मुलाने स्वतःच्या बापावरच गोळ्या झाडल्याची घटना गुरूवारी (दि. 20 मे) सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष किसन लटपटे, असे त्या सेवानिवृत्त सैनिकाचे नाव असून उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथे दाखल केले आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरूवार (दि.20) सांयकाळी चार वाजण्याच्या सुमारास संतोष लटपटे हे आपल्या पत्नीला गणपती चौकात दारूच्या नशेत मारहाण करत घरी गेले. घरी गेल्यानंतर ते आपल्या पत्नीला मारहाण करत तुला आता गोळ्या घालूनच मारून टाकतो असे वारंवार बोलत बंदूकीचा निशाणा पत्नीवर धरला. तेवढ्याच त्यांचा मुलगा नशेत असलेल्या किरण लटपटेने वडिल संतोष यांच्या हातातील बंदूक खाली पाडली. त्यानंतर किरणने ती बंदूक उचलत त्यांनी दोन गोळ्या वडिलांवर झाडल्या. त्यापैकी एक गोळी हुकली मात्र, दुसरी गोळी संतोष यांच्या पोटात लागली. त्यानंतर जखमी संतोष लटपटे यांना आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, रक्तस्त्राव जास्त झाल्याने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

बंदूकीचा होता अधिकृत परवाना

आष्टी मुर्शदपूर भागातील राहणारे संतोष लटपटे हे 1 मे, 2021 रोजी सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्याकडे बंदूकीचे अधिकृत परवाना असल्याने ते ती बंदूक स्वत:कडे बाळगत होते.

सतत होत होते भांडणे

गेल्या अनेक दिवसांपासून घरात पती-पत्नीचे वाद होत होते. संतोष हे त्यांच्या पत्नीस दारुच्या नशेत मारहाण करत गोळ्या घाली, असे सतत धमकावत होते. रागाच्या भरात वडिलांना गोळी घालत्याची माहिती स्वतः किरणने पोलिसांना दिली, असे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी सांगितले.

हेही वाचा - अंबाजोगाईत एकाच ओढणीने गळफास घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या

Last Updated :May 20, 2021, 9:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.