ETV Bharat / crime

Honor Killing In Hyderabad : हैदराबादमध्ये सैराट.. आंतरजातीय लग्न केल्याने बहिणीच्या नवऱ्याची भरबाजारात हत्या

author img

By

Published : May 21, 2022, 9:42 AM IST

तेलंगणातील हैदराबाद शहरात सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. विरोध असूनही आंतरजातीय लग्न केल्याने बहिणीच्या नवऱ्याची चाकूने सपासप वार करून भरबाजारात हत्या करण्यात ( Begumbazar honor killing case ) आली. शुक्रवारी (दि. २०) ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी दहा आरोपींना अटक केली ( Honor Killing In Hyderabad ) आहे.

ANOTHER HONOR KILLING IN HYDERABAD.. MAN WAS KILLED BY HIS WIFE's FAMILY
आंतरजातीय लग्न केल्याने बहिणीच्या नवऱ्याची भरबाजारात हत्या

हैदराबाद (तेलंगणा) : हैदराबादमध्ये 15 दिवसांत आणखी एक ऑनर किलिंगची घटना ( Honor Killing In Hyderabad ) घडली. बेगमबाजार येथील मच्छी मार्केटमध्ये ( Begumbazar Macchi Market ) पाच गुंडांनी एका व्यक्तीचा भोसकून खून केला. नीरज पनवार असे पीडित तरुणाचे नाव आहे. वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या तरुणाची पत्नीच्या घरच्यांनी वार करून हत्या ( Begumbazar honor killing case ) केली. स्थानिकांनी सांगितले की, नीरज पनवारवर जवळपास 20 वार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवला. गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे.

लग्नाला होता विरोध : एसीपी सतीश कुमार आणि सीआय अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगमबाजार, कोळसावाडी येथील नीरज कुमार पनवार (२२) हे भुईमुगाचा व्यवसाय करतात. त्याच परिसरातील संजना (20) हिच्यावर त्याचे प्रेम जडले आणि दीड वर्षापूर्वी तिच्याशी लग्न केले. त्यांच्या घरी दीड महिन्यापूर्वी मुलगा झाला. संजनाच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता आणि लग्न झाल्याने ते संतापले होते. संजनाचा भाऊ सहा महिन्यांपासून नीरजला मारण्याची संधी शोधत होता. संजनाच्या भावाने आठवडाभर नीरजवर पाळत ठेवली.

चाकूने केले सपासप वार : शुक्रवारी बाजारात फारशी गर्दी नसल्यामुळे संजनाच्या भावाने नीरजला मारण्याची संधी साधत त्याच्या मित्रांना माहिती दिली. ते सर्वजण तेथे पोहोचले आणि नीरज रस्ता ओलांडत असताना मागून आले. त्यांनी त्याच्या डोक्यावर ग्रेनाईट दगड मारला. त्यानंतर संजनाच्या भावाने नीरजवर चाकूने वार केले आणि नीरजची हत्या करून ते तेथून फरार झाले.

दहा जणांना अटक : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नीरजला शाहिनात गंज पोलिसांनी तातडीने उस्मानिया रुग्णालयात दाखल केले. त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. नीरजची हत्या करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ओळखले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना दिली होती कल्पना : आंतरजातीय विवाह केलेल्या नीरजने वर्षभरापूर्वी आपल्या पत्नीच्या कुटुंबापासून धोका असल्याचे लक्षात आल्यानंतर अफजलगंज पोलिसांकडे धाव घेतली होती. त्याने संरक्षणाची विनंती केली पण उपयोग झाला नाही. बेगम बाजारच्या व्यापाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, आरोपींनी नीरजवर जवळपास 20 वार केले. नीरजच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्री मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निदर्शने केली. व्यापाऱ्यांनी शनिवारी बेगमबाजार बंदची हाक दिली आहे.

हेही वाचा : बहिणीसोबत ठेवले प्रेमसंबंध.. भावाने काढला बहिणीच्या प्रियकराचा काटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.