ETV Bharat / city

Passenger Robbers Arrested Thane: डोळ्यात गरम मसाल्याची पुड टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

author img

By

Published : Sep 20, 2022, 1:01 PM IST

दुचाकी वरून जाणाऱ्या प्रवाशाचा पाठलाग करत त्यांच्या डोळ्यात गरम मसाल्याची पुड टाकून लुटणाऱ्या (Robbers threw masala powder in eyes arrested) दोघांना भिवंडीतील नारपोली पोलिसांना दीड महिन्यानंतर बेड्या ठोकल्यात यश (Passenger Robbers Arrested Thane) आले आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. (Robbers threw masala powder in eyes arrested)

डोळ्यात गरम मसाल्याची पुड टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक
डोळ्यात गरम मसाल्याची पुड टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

ठाणे : दुचाकी वरून जाणाऱ्या प्रवाशाचा पाठलाग करत त्यांच्या डोळ्यात गरम मसाल्याची पुड टाकून लुटणाऱ्या (Robbers threw masala powder in eyes arrested) दोघांना भिवंडीतील नारपोली पोलिसांना दीड महिन्यानंतर बेड्या ठोकल्यात यश (Passenger Robbers Arrested Thane) आले आहे. मिनाजुल फैजुल हक (वय २५), शरीमुद्दीन अन्वरउद्दीन रेहमान (वय २३) असे बेड्या ठोकलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी अनिल शंकरलाल पहुजा ( वय ५१, रा.लुईसवाडी,ठाणे.) यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. (Robbers threw masala powder in eyes arrested)

सापळा रचून केली अटक - या गुन्ह्याच्या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्याचे वपोनि मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन पाटील यांनी पोलीस निरीक्षक (प्रशा) राजेश वाघमारे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव,पोह सुशिल इथापे,समीर ठाकरे,राजेश पाटील,पोना संदीप जाधव,पोशि जनार्दन बंडगर,विजय ताटे या पोलीस पथकासह तांत्रिकरित्या तपास सुरू केला होता. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत दोघा आरोपी पैकी एकजण भिवंडीतील काल्हेर भागात येणार असल्याची खबर चेतन पाटील यांना मिळाली, या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून मिनाजुल फैजुल हक याला ताब्यात घेऊन अटक केली.

दुचाकी, एटीएम, क्रेडिट कार्ड जप्त - आरोपी मिनाजुल याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याचा साथीदार शरीमुद्दीन अन्वरउद्दीन रेहमान याचे नाव तपासात पुढे आल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेवून त्यालाही अटक करण्यात आली आहे. अटक चोरट्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीसह २० हजार ११० रुपयांचे चार मोबाईल, वेगवेगळ्या बँकेचे एटीएम, क्रेडिट कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोरीच्या क्रेडिट कार्डवरून ऑनलाईन खरेदी - विशेष म्हणजे आरोपी मिनाजुल आणि शरीमुद्दीन या दोघा चोरट्यांनी आपसात संगनमत करून तक्रारदार अनिल यांच्या क्रेडिट कार्डवरून फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंगच्या साईटवरून १ लाख ६१ हजार ३८८ रुपयांची महागड्या वस्तू ऑनलाईन खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.