ETV Bharat / city

CCTV FOOTAGE - कांदे बटाटे व्यापाऱ्याला भरदिवसा लुटले

author img

By

Published : Oct 23, 2021, 9:39 PM IST

सुभाष सदाशिव परदेशी हे पायी निघाले होते. रस्त्याने पायी जात असतानाच दोघे त्यांचा पाठलाग करत होते. तिसरा साथीदार समोरून बाईक वरून येताच या व्यापाऱ्यास धक्का देऊन त्यांना पाडले. व त्यांच्या हातातील पाऊणे तीन लाख रुपये असलेली बॅग खेचून आपल्या साथीदाराच्या बाईकवर बसून पळ काढला.

CCTV FOOTAGE
CCTV FOOTAGE

ठाणे : एका कांदे बटाटा व्यापाऱ्याला भरदिवसा त्रिकुटाने रस्त्यातच लूटमार केली. आणि पावणे तीन लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. ही घटना भिवंडी शहरातील खडक रोड भागात घडली आहे. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात लुटारूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुभाष सदाशिव परदेशी असे व्यापाऱ्याचे नाव आहे.

कांदे बटाटे व्यापाऱ्याला भरदिवसा लुटले

शनिवारी उधारीच्या वसुलीसाठी व्यापारी भिवंडीत
सुभाष सदाशिव परदेशी हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील कांदे बटाटा घाऊक विक्रेते आहेत. ते भिवंडी परिसरात कांदे बटाटे विक्रीसाठी उधारीवर देऊन दर शनिवारी पैसे वसुलीसाठी येतात. त्यामुळे आजही शनिवार असल्याने ते शहरातील खडक रोड या भागातील व्यापाऱ्यांकडे आपले उधारीचे पैसे वसूल करून दुपारी पाऊणे बारा वाजताच्या सुमारास रस्त्याने पायी निघाले होते.

चोरांनी दुचाकीवरून धूम ठोकली
रस्त्याने पायी जात असतानाच दोघे त्यांचा पाठलाग करत होते. तिसरा साथीदार समोरून बाईक वरून येताच या व्यापाऱ्यास धक्का देऊन त्यांना पाडले. व त्यांच्या हातातील पाऊणे तीन लाख रुपये असलेली बॅग खेचून आपल्या साथीदाराच्या बाईकवर बसून पळ काढला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटीच्या घटनेमुळे व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर निजामपुरा पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - जणू काही संपूर्ण जगातील अमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.