ETV Bharat / city

Threatened To Girl इंस्टाग्रामवर मैत्रीनंतर तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

author img

By

Published : Aug 15, 2022, 4:59 PM IST

तरुणीशी इंस्टाग्रामवर मैत्री girl friendship on Instagram करून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी girl threatened to viral vulgar photos देणाऱ्या एका आरोपीला विष्णूनगर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून राजस्थानातून accused arrested from Rajasthan अटक केली. सोहेल सलामदद्दीन खान वय 18 वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातल्या तारानगरमध्ये राहणारा आहे.

Thane police arrested accused from Rajasthan
तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास अटक

ठाणे तरुणीशी इंस्टाग्रामवर मैत्री girl friendship on Instagram करून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी girl threatened to viral vulgar photos देणाऱ्या एका आरोपीला विष्णूनगर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून राजस्थानातून accused arrested from Rajasthan अटक केली. सोहेल सलामदद्दीन खान वय 18 वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातल्या तारानगरमध्ये राहणारा आहे. Threatened To Girl in Thane


धमकीने तरुणी भयभीत पिडीत तरुणी डोंबिवलीत कुटूंबासह राहते. आरोपी सोहेल खान याने इंस्टाग्रामवर काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीशी मैत्री केली होती. त्यानंतर मैत्रीचा फायदा घेऊन आरोपीने या तरुणीला व्हिडीओ कॉल केले. आरोपीने तरुणीच्या अश्लील फोटोंचे स्क्रीनशॉट काढले आणि माझ्याशी बोलली नाहीस तर हेच अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित करेन अशी धमकी दिली. या धमकीने भयभीत झालेल्या तरुणीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. अखेर घरच्यांच्या मदतीने तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 354 (ड) आयटी ॲक्ट 67 (अ) सह पोक्सो कायद्याचे कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला.


मोबाईल लोकेशनमुळे आरोपी पोलिसांच्या तावडीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम नागरे, किरण नलावडे आणि दिलीप पवार यांनी आरोपीच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून माहिती काढली. त्यानंतर या पोलिसांनी राजस्थानमध्ये Thane Police arrested accused from Rajasthan जाऊन सोहेल खान याला बेड्या ठोकल्या. कल्याण कोर्टाने Kalyan district court त्याला अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा Firing On Akola Police अमरावतीत अकोला पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला सिनेस्टाइल पकडले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.