ETV Bharat / city

Thane Crime : मद्यात द्रव्य मिसळून महिलांसोबत बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

author img

By

Published : May 11, 2022, 12:51 PM IST

वाढदिवसाच्या निमित्ताने घरी बोलावून मैत्रिणीला शीतपेय सांगून अल्कोहोल मिश्रित द्रव्य पाजून तिच्यासोबत जबरदस्तीने करणाऱ्या या नराधमाला कळवा पोलिसांनी गोवा येथून अटक केली आहे. या नराधमाने नशेच्या अवस्थेत असलेल्या या पिडीत तरुणीसोबत जबरदस्ती केली.

Thane Crime
Thane Crime

ठाणे : सोशल मीडियाचा जसा फायदा आहे तसा तोटा ही वारंवार समोर आली आहे. त्यात खासकरून तरुणांना याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करण्यापेक्षा वाईट कामासाठी कसा करता येईल याकडे जास्त आहे. एका युवकाने सोशल मीडियाचा दुरुपयोग करून एका तरुणीचे आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने घरी बोलावून मैत्रिणीला शीतपेय सांगून अल्कोहोल मिश्रित द्रव्य पाजून तिच्यासोबत जबरदस्तीने करणाऱ्या या नराधमाला कळवा पोलिसांनी गोवा येथून अटक केली आहे. या नराधमाने नशेच्या अवस्थेत असलेल्या या पिडीत तरुणीसोबत जबरदस्ती केली आणि त्यादरम्यान तरुणीचे फोटो आणि व्हिडियो काढून ठेवले. त्यानंतर नराधमाने या पिडीत तरुणीला धमकावत तिच्यासोबत तीन वर्ष बलात्कार केल्याचा खुलासा तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर उघड झाला आहे.


सोशल मिडीया धोकादायक
सोशल मीडिया किती धोकादायक आहे याचे ताजे उदाहरण ठाणे शहरात पाहायला मिळत आहे. आरोपी गणेश हा मुलींशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलवायचा. कोल्ड्रिंकमध्ये मद्य किंवा नशेचा वस्तू मिळवून त्यांच्यावरती बलात्कार करायचा. याचे व्हिडिओ व फोटो तयार करून प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित करायचा. गणेश सुरवसे याने अनेक वेळा अशा प्रकारे मुलींना फसवण्याचे प्रकार केले आहेत. गणेश उर्फ जितु अशोक सुरवसे हा नराधम दिवा येथील रहिवाशी आहे. गणेश सुरवसे या ३३ वर्षीय नराधमाने आपल्या मैत्रीचा गैरफायदा घेत आपल्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या निमित्ताने राहत्या घरी बोलावले.

शीतपेय सांगून अल्कोहोल द्रव्य पाजले

यावेळी या नराधमाने तरुणीला शीतपेय सांगून अल्कोहोल मिश्रित द्रव्य पाजले. तरुणी नशेत असल्याचा फायदा उचलत या नराधमाने तिच्यासोबत बलात्कार केला. त्यावेळी त्याने तरुणीचे मोबाईलच्या मदतीने फोटो आणि व्हिडियो काढले. महिला शुद्धीत आल्यानंतर तिने या संपूर्ण प्रकारचा विरोध केला. आणि माणसाला भेटणे बंद केले. नंतर त्या नराधमाने तिच्यासोबत अतिप्रसंग करतानाचे व्हिडियो आणि फोटो दाखवत तिला व्हायरल करण्याची धमकी दिली. तो २०१९ ते २०२२ असे तीन वर्ष तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करत होता. जानेवारी २०२२ मध्ये फिर्यादी तरुणीचे लग्न ठरले होते.

हेही वाचा - Minor Girl Raped In Nagpur : लग्नाच्या दोन दिवस आधी नवरदेवाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार..

खोटे अकाऊंट बनवले

याची माहिती या नराधमाला मिळाल्यानंतर त्यावेळी त्याने पिडीत तरुणीच्या नावाने सोशल मिडीयावर खोटे अकाऊंट तयार करून त्या अकाऊंटच्या सहाय्याने त्याने पिडीत तरुणीच्या मित्र आणि नातेवाईकांना अश्लील मेसेजेस, फोटो आणि बदनामी कारक मजकूर पाठवून तरुणीची बदनामी करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या नावाने ‘सेक्स चॅट आणि व्हिडियो कॉल’ प्रसारित केले. या पिडीत तरुणीला अनोळखी व्यक्तीचे कॉल आणि मेसेजेस यायला लागले.

पोलिस ठिकाण बदलायचा
पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला असता आरोपी हा सारखा आपला मोबाईल नंबर बदलत होता तसेच उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गोवा असे ठिकाण बदलत होता. पोलिसांनी त्याचा मोबाईलच्या आयएमईआय नंबर वरून माग काढत गोवा येथून अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी या नराधमाला न्यायालयात हजर केले. यात न्यायालयाने त्याला १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली.

तरुणींना पोलिसांचे आवाहन
पिडीत तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या नराधमाच्या विरोधात भादवीस कलम ३७६, ५०७, ५०६ (२) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क), ६६ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर या नराधमाने या आधी अशा प्रकारे आणखी कुठल्या तरुणीसोबत अश्या प्रकारचे कृत्य केले आहे का याचा तपास पोलीस करत असून,अशा प्रकारे इतर काही तरुणींसोबत किंवा महिलांसोबत कृत्य घडत असेल तर त्यांनी न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन कळवा पोलिसांनी केले आहे .
हेही वाचा - Youth Murder Nagpur : नागपुरात रागाने पहिल्याच्या वादातून तरुणाची हत्या, आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.