ETV Bharat / city

VIDEO : स्टंटबाजांचा मीरा रोडवर धुमाकूळ, कारवाईची स्थानिकांची मागणी

author img

By

Published : Oct 26, 2021, 3:00 PM IST

Updated : Oct 26, 2021, 3:08 PM IST

मीरा रोडच्या एल. आर. तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच्या मोकळ्या रस्त्यावर बरेच तरुण दिवसा व रात्री मोटारसायकल, चारचाकी वाहन तसेच रिक्षाचालकदेखील स्टंटबाजी करत आहेत, जे पाहूनच अंगावर काटा उभा राहतो. कधीकधी लोक धोकादायक स्टंट करताना आपला जीवदेखील गमावतात. असे असूनही लोक यातून धडा घेत नाहीत. सध्या असाच काही प्रकार एल. आर. तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच्या रस्त्यावर सुरू आहे.

मीरा रोड स्टंट्स
मीरा रोड स्टंट्स

मीरा भाईंदर - मीरा रोडच्या एल. आर. तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच्या रोडवर स्टंटबाजांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र स्थानिक पोलीस व वाहतूक विभाग दुर्लक्ष करत आहे.

हेही वाचा - परभणीत दोन तरुणांची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी; एक शेतकरी गेला वाहून

जीव धोक्यात घालून स्टंटबाजी

मीरा रोडच्या एल. आर. तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच्या मोकळ्या रस्त्यावर बरेच तरुण दिवसा व रात्री मोटारसायकल, चारचाकी वाहन तसेच रिक्षाचालकदेखील स्टंटबाजी करत आहेत, जे पाहूनच अंगावर काटा उभा राहतो. कधीकधी लोक धोकादायक स्टंट करताना आपला जीवदेखील गमावतात. असे असूनही लोक यातून धडा घेत नाहीत. सध्या असाच काही प्रकार एल. आर. तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच्या रस्त्यावर सुरू आहे. स्टंट करत असल्याचा एका रिक्षाचालकांचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रिक्षाचालक चक्क रिक्षा दोन चाकावर चालवताना दिसून येत आहे. पोलिसांनी अशा स्टंटबाजी करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

होताहेत वाद

एल. आर. तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर मोकळा रस्ता आहे. वाहनांची तितकीशी वर्दळ नसल्याने अनेक महिला व पुरुष, वृद्ध व्यक्ती मॉर्निंग वॉक करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना या भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या स्टंटबाजांचा सामना करावा लागत आहे. त्यातच अनेक सामान्य नागरिकांशी वाद झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. वाहतूक पोलिसांनी अशांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

हेही वाचा - धावत्या कारमध्ये धांगडधिंगा करणाऱ्या ४ तरुणांना अटक

'पोलिसांनी कारवाई करावी'

रात्री कामावरून आल्यावर जेवण केल्यानंतर शतपावली करायला जातो. त्यावेळी अनेक तरुण स्टंट करताना दिसतात. पूर्वीपेक्षा आता स्टंट करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस कारवाई करीत नाहीत. यावर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, असे मत स्थानिक नागरिक बिपीन उपाध्याय यांनी व्यक्त केले.

Last Updated : Oct 26, 2021, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.