ETV Bharat / city

Furniture Market Fire Thane : फर्निचर मार्केटमधील इमारतीला भीषण आग; लाखाेच्या साहित्याची राखरांगोळी

author img

By

Published : Oct 3, 2022, 8:09 PM IST

उल्हासनगर शहरातील कँम्प नंबर ३ परिसरात असलेल्या फर्निचर मार्केटमध्ये एका इमारतीमधील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग (furniture market fire Thane) लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत आहेत. (Latest News Thane)

Furniture Market Fire Thane
Furniture Market Fire Thane

ठाणे : उल्हासनगर शहरातील कँम्प नंबर ३ परिसरात असलेल्या फर्निचर मार्केटमध्ये एका इमारतीमधील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग (furniture market fire Thane) लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत आहेत. (Latest News Thane)

फर्निचर मार्केटला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे जवान व पोलीस प्रशासन

आगीनंतर मार्केटमध्ये एकच खळबळ- उल्हासनगर शहरातील कँम्प नंबर ३ परिसरातील दोन मजली इमारतीमध्ये अहुजा फर्निचर नावाचे शोरूम आहे. या इमारतीच्या टेरेसवरच्या मजल्यावर आग अचानक लागल्याने मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल होऊन तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. मात्र या आगीत लाखोंचे फर्निचर जळून खाक झाले. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु असून ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आला. सुदैवाने आज सोमवारी फर्निचर मार्केट बंद असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.