ETV Bharat / city

Chhota Rajan Accomplice Arrest छोटा राजनने दिली होती चक्क बैलाच्या हत्येची सुपारी, मारेकरी अटकेत

author img

By

Published : Aug 20, 2022, 7:07 PM IST

Updated : Aug 20, 2022, 7:40 PM IST

दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर Daud Ibrahim brother Iqbal Kaskar यांच्या सुरक्षारक्षकाची गोळ्या घालून हत्या Iqbal kaskar bodyguard murder करणाऱ्या छोटा राजन टोळीतील फरार गुंड मुस्तफा सय्यद Gangster Mustafa Syed arrest याला ठाणे गुन्हे शाखेने Thane crime branch अटक केली आहे. हा मुस्तफा नागपूर कारागृहातून पेरलवर आल्यावर तो फरार होता. याबाबत ठाणे गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याला मुंब्रा परिसरातून अटक केली आहे.

Chhota Rajan accomplice arrested in Mumbra
छोटा राजन टोळीतील फरार गुंड मुस्तफा सय्यद पोलिसांच्या ताब्यात

ठाणे दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर Daud Ibrahim brother Iqbal Kaskar यांच्या सुरक्षारक्षकाची गोळ्या घालून हत्या Iqbal kaskar bodyguard murder करणाऱ्या छोटा राजन टोळीतील फरार गुंड मुस्तफा सय्यद Gangster Mustafa Syed arrest याला ठाणे गुन्हे शाखेने Thane crime branch अटक केली आहे. हा मुस्तफा नागपूर कारागृहातून पेरलवर आल्यावर तो फरार होता. याबाबत ठाणे गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याला मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. Chhota Rajan accomplice arrested in Mumbra

छोटा राजनने दिले होते बैलाच्या हत्याकांडाचे आदेश कुख्यात गुंड छोटा राजन याने सन 2011 साली दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरचा बॉडीगार्ड आरिफ बैल यास जीवे ठार मारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर छोटा राजनचा विश्वासू सहकारी रवी मल्लेश बोरा उर्फ डिके राव, बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद व इतर सात लोकांनी आरिफ बैल यास नागपाडा, मुंबई येथे गोळीबार करून जीवे ठार मारले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी डिके राव छोटा राजन व इतर आरोपींविरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात Nagpada police station खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद यास व इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती.

बैलाच्या मारेकऱ्याला मुंब्रातून अटक या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला फायरिंग मधील मुख्य आरोपी बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद हा नागपूर कारागृह येथे शिक्षा भोगत असताना पेरोलवर रजेवर सुटून तुरुंगाबाहेर आला होता. तेव्हा पासून फरार झाला होता. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या आरोपीचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाचे पोलीस नाईक भामरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासाच्या आधारे फरार आरोपीस मुंब्रा येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्यास वैद्यकीय तपासणी करून त्याला मुंब्रा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

हेही वाचा Threat Message to Attack Mumbai हल्ल्याची धमकी देणाऱ्याने व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला यूपी एटीएसचा नंबर

Last Updated : Aug 20, 2022, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.