Fatal Accident in Kasara Ghat कसारा घाटात केळीचे ट्रक व टेम्पोमध्ये भीषण अपघात, अपघातात एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

author img

By

Published : Aug 22, 2022, 2:09 PM IST

Fatal Accident in Kasara Ghat

नवीन कसारा घाटात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केळीच्या ट्रकने आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक Fatal Accident in Kasara Ghat दिल्याने भीषण अपघात झाला. ट्रकची एवढी जोरदार धडक की टेम्पो दरडीवर जाऊन Banana Truck Hit an Eicher Tempo From Behind आदळल्याने पलटी होऊन टेम्पोमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी One Person is Seriously Injured झाला आहे. पप्पू यादव असे मृत चालकाने नाव आहे.

ठाणे नवीन कसारा घाटात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केळीच्या ट्रकने आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात Fatal Accident in Kasara Ghat झाला. ट्रकची एवढी जोरदार धडक Banana Truck Hit an Eicher Tempo From Behind की टेम्पो दरडीवर जाऊन आदळल्याने पलटी होऊन टेम्पोमधील चालकाचा जागीच मृत्यू Death of Tempo Driver झाला. तर एक जण गंभीर जखमी One Person is Seriously Injured झाला आहे. पप्पू यादव असे मृत चालकाने नाव आहे.

ट्रक व टेम्पोमध्ये भीषण अपघात,


धबधबा पॉईंटनजीक ट्रकने टेम्पोला दिली पाठीमागून जोरदार धडक मुंबईकडे केळीने भरलेला ट्रक आज सकळाच्या सुमारास कसारा घाटातून जात होता. त्याचवेळी घाटातील धबधबा पॉईंटनजीक भरधाव ट्रकने टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत अपघातग्रस्त टेम्पो रस्त्याकडेला असलेल्या दरडीवर जाऊन पलटी झाला. तर केळाने भरलेला ट्रक महामार्गावर पटली होऊन ट्रकमधील केळीचा सडा मार्गावर पसरला होता. या आपघाताची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य प्रकाश शिंदे व देवा वाघ यांना मिळताच त्यांनी तात्काळ कसारा नवीन घाट .धबधबा पॉईंट वर पोहचले, अपघात भीषण असल्याने 108 रुग्णवाहिकाला कॉल देत बोलवून घेण्यात आली. व महामार्ग पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले .


दीड ते दोन तास अथक प्रयत्न त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य शाम धुमाळ, दत्ता वाताडे ,प्रसाद दोरे, जस्सी भाई ,बाळू मागे, अक्षय राठोड,विनोद आयरे घटनास्थळी दाखल होऊन पोलीस व खासगी क्रेनच्या मदतीने मदत कार्य सुरु केले. आयषर टेम्पो मधील एक जखमी अगोदरच प्रकाश शिंदे यांनी बाहेर काढलेला होता. मात्र जागीच मृत्यू झालेल्या चालकाला टेम्पोमधून बाहेर काढण्यासाठी दीड ते दोन तासाच्या अथक प्रयत्न करावे लागले.


वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दरम्यान, जखमींना कसारा येथील रुग्णालयात रवाना केले. तर चालकाचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेने कसारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवला . दरम्यान रस्त्यावर केळीचा सडा पडल्याने दुचाकी स्लीप होत होत्या. तर या अपघातामुळे कसारा घाटात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. या अपघाताची नोंद कसारा पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हेही वाचा Udayanraje Bhosale सातार्‍यातील दहीहंडीत उदयनराजेंचा जलवा अन तरूणाईचा जल्लोष, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.