ETV Bharat / city

Yakub Menons: याकूब मेननचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही पोलिस प्रशासनाला दिले कारवाईचे आदेश - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

author img

By

Published : Sep 9, 2022, 6:01 PM IST

याकूब मेनन ( Yakub Menons ) हा बॉम्ब ब्लास्टचा आरोपी आहे. त्याला फाशी दिलेली आहे. त्याचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही पोलिस आणि मुंबई महापालिकेला ( Municipal Corporation of Mumbai ) आदेश दिले आहेत. गृह विभाग योग्य ती कारवाई करत आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी ठाण्यात दिली .

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : याकूब मेनन ( Yakub Menons ) हा बॉम्ब ब्लास्टचा आरोपी आहे. त्याला फाशी दिलेली आहे. त्याचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही पोलिस आणि मुंबई ( Municipal Corporation of Mumbai )महापालिकेला आदेश दिले आहेत. गृह विभाग योग्य ती कारवाई करत आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी ठाण्यात दिली. काल अनेक बैठका झाल्या त्यात सिनेकलाकार आणि कर्मचारी देखील आले होते हे सरकार तात्काळ निर्णय घेणारे सरकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


ठाण्यातील टेम्भी नाका येथे आनंददिघे यांनी सुरूवात केलेल्या नवरात्री उत्सवाचे देवीच्या पाठ पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. दर वर्षी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होते ही पुजा होत असते. यावेळी या कार्यक्रमाला शिंदे गटासोबत उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे केदार दिघे हे देखील उपस्थित होते. यंदाचा नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात होणार साजरा करणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

याकूब मेननचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही पोलिस प्रशासनाला दिले कारवाईचे आदेश -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



पुन्हा दोन गट आले समोरासमोर - टेंभी नाक्यावरील या देवीच्या पाठपूजनाच्या कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे आणि राजन विचारे हे दोन्ही गट पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाला राजांनी विचारे यांनी देखील पाठपूजन करत या कार्यक्रमाची सुरुवात केली तर एकनाथ शिंदे यांनी देखील पूजा करून या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.


मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिली आनंदाश्रमाला भेट - आनंद दिघे यांचं कार्यालय असलेल्या आनंदाश्रमाला आज एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भेट दिली आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं पूजन देखील केलं एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत आणि त्यांच्या जीवनावर आनंद दिघे यांचा मोठा परिणाम झालेला मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत त्यामुळे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आनंद आश्रमाला या पाठपुर्जनाच्या कार्यक्रमानिमित्त भेट दिली.



ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.