ETV Bharat / city

Forest Guard Murder वनरक्षकाच्या हत्येप्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल, पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

author img

By

Published : Sep 11, 2022, 7:52 PM IST

शहापूरमधील कुंदन वामन भोईर नामक वनरक्षकाचा; शहापूर तालुक्यातील माहुली धबधब्यात, दीड महिन्यापूर्वी मृत्यू झाला (Forest Guard Murder) होता. मात्र पोलिसांच्या चालढकल कारभारामुळे तब्बल दीड महिन्यानंतर, १० जणांसह त्यांच्या इतर साथीदारांवर शहापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल (Case registered after one and a half month) झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, अद्यापही आरोपी मोकाट (police tried to suppress case) आहेत.

Forest Guard Murder
वनरक्षकाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल

ठाणे शहापूर तालुक्यातील माहुली धबधब्यात, दीड महिन्यापूर्वी शहापूरमधील वनरक्षकाचा संशयास्पद मृत्यू (Forest Guard Murder) झाला होता. मात्र पोलिसांच्या चालढकल कारभारामुळे (police tried to suppress case) तब्बल दीड महिन्यानंतर, १० जणांसह त्यांच्या इतर साथीदारांवर शहापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल (Case registered after one and a half month) झाल्याने खळबळ उडाली आहे. सचिन तळपाडे, वैभव पाटोळे, दामोदर भोईर, राम पाटोळे, प्रशांत दसरे, संदीप जाधव, किशोर दिनकर, चिंतामण वेखंडे, सुनिल भोंडविले, चंद्रकांत प्रकाश मोरे व इतर त्यांचे साथीदार असे हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. खळबळजनक बाब म्हणजे या आरोपींमध्ये वन कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचा समावेश आहे. तर कुंदन वामन भोईर असे हत्या झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे.



मित्रांनी आग्रह केल्याने गेला धबधब्यावर दीड महिन्यापूर्वी दुपारच्या सुमारास वनकर्मचारी कुंदन भोईर यांचा माहुली धबधब्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळी घटनास्थळी त्यांचा मृतदेह फक्त पँन्ट घातलेल्या तर उर्वरीत शरीर उघडे अशा अवस्थेत आढळून आला होता. मृताच्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे, त्यादिवशी माझ्या पतीला फोन करुन माहुली धबधब्यात ये म्हणून मित्र आग्रह धरीत होते. शिवाय पतीच्या मृत्यूनंतर सर्वजण घटनस्थळावरून पळून गेले होते. त्यामुळे कुठल्यातरी अज्ञात कारणावरुन पतीचा घातपात घडविण्यात आला आहे, असा संशय त्यावेळी सुप्रिया भोईर यांनी व्यक्त केला होता. घटनेच्या दिवशी माझ्या पतीसोबत असलेल्या ११ जणांची चौकशी करण्याची मागणी, त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली. तसेच पोलीसांनी अधिक तपास केल्यास हा अपघात नसून, खून करण्यात आल्याचे निष्पन्न होईल यासाठी पोलिसांकडे लेखी तक्रार सुप्रिया भोईर यांनी दिली होती.



न्यायालयाच्या आदेशानंतर हत्येचा गुन्हा दाखल पोलीसांनी सुप्रिया भोईर यांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता, अर्जावर दुर्लक्ष करून चालढकल करीत होते. त्यामुळे पोलीसांकडून न्याय मिळत नसल्याने, मृतक वनरक्षक कुंदन यांची पत्नी सुप्रिया भोईर यांनी अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेत, शहापूर न्यायालयाचे न्यायाधीश ए. डी. वामन यांनी तात्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश, शहापूर पोलीसांना दिले. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर शहापूर पोलीस ठाण्यात तब्बल दीड महिन्यानंतर वनरक्षक कुंदन भोईर यांच्या हत्येप्रकरणी अधिनियम भारतीय दंड संहिता १८६०, कलम ३०२ व ३४ प्रमाणे ५ सप्टेंबर २०२२ रोजी १० जणांसह त्यांच्या इतर साथीदारांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.



सर्वच आरोपी मोकाट गुन्हा दाखल होऊन सात दिवस उलटूनही अद्याप एकाही आरोपीला पोलीसांकडून अटक करण्यात आली नसून; सर्वच आरोपी मोकाट असल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलीसांकडून आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मृत कुंदन भोईर यांच्या पत्नी सुप्रिया भोईर, भाऊ चंदन भोईर, वडील वामन भोईर यांनी केला आहे. शिवाय शहापूर पोलीसांकडून हत्येचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत, माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मृत कुंदन भोईर यांच्या पत्नी सुप्रिया भोईर यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.