ठाण्यात झाडे पडण्याचे सत्र... दोन महिन्यांत 182 झाडे पडून 29 वाहनांचे नुकसान

author img

By

Published : Jul 23, 2021, 11:50 PM IST

Updated : Jul 24, 2021, 2:52 AM IST

ठाण्यात झाडे पडण्याचे सत्र

जून महिन्याच्या पंधरवड्यानंतर सुरु झालेल्या दमदार पावसामुळे जीवसृष्टीला दिलासा मिळाला होता. अशातच पाऊस आणि सोसाटयाच्या वार्‍यांमुळे शहरातील झाडांना याचा मोठ्या प्रमाणत फटका बसला आहे.

ठाणे - ठाण्याचे वाढते शहरीकरण आणि सिमेंट रस्त्याचे वाढलेले प्रमाण यामुळे झाडांच्या मुळावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे झाडांच्या मुळ्या निर्जीव होऊन झाडे पडण्याचे सत्र वाढले आहे. जून आणि जुलै या दोन महिन्याच्या कालावधीत शहरत तब्बल १८२ झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झाली आहे.

यंदा जून महिन्यात आलेल्या तोक्तो चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या झाडे कोसळली होती. त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह मागील दोन ते तीन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहरात झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाण्यात झाडे पडण्याचे सत्र.


हेही वाचा-नागपुरात गोळीबार : क्षुल्लक वादातून केलं कृत्य; सहा जणांना अटक


ठाणे शहरातील रस्त्यांच्या रुदीकरणाच्या मोहिमेमुळे शहारतील ठिकठिकाणी खोदकामे सुरू आहेत. यामध्ये अनेकदा झाडांच्या मुळांवरदेखील घाव बसत आहे. तसेच पावसाळ्यापुर्वी करण्यात येणारी छाटणी व्यवस्थित होत नाही. झाडांना ठोकण्यात येणारे खिळे, झाडांची खोडांना सिंमेंटचा विळखा यामुळे त्यांना प्राण वायू मिळत नाही. परिणामी झाडे निर्जीव होवून ते उन्मळण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हेही वाचा-कोल्हापूर : कुपलेवाडीत भूस्खलन, पाच जनावरांसह पती-पत्नीचा मृत्यू

जून महिन्याच्या पंधरवड्यानंतर सुरु झालेल्या दमदार पावसामुळे जीवसृष्टीला दिलासा मिळाला होता. अशातच पाऊस आणि सोसाटयाच्या वार्‍यांमुळे शहरातील झाडांना याचा मोठ्या प्रमाणत फटका बसला आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या, झाडांच्या फांद्या तुटणे, झाडांची स्थिती धोकादायक होणे आदी प्रकार मोठया प्रमाणात घडत आहेत.

हेही वाचा-Ratnagiri Flood : डोंगराखाली 7 घरं, 17 माणसं गाडली; 4 मृत्यू


पावसाळ्यात घटनांमध्ये वाढ

पावसाळ्यापूर्वी वृक्षांची योग्य तर्‍हेने छाटणी न झाल्याने ही परिस्थिती ओढवत असल्याची माहिती पर्यावरण तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. गेल्या महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे ठाण्याला मोठा फटका बसला होता. अनेक ठिकाणी या वादळाने झाडांचा बळी घेतला होता. एकट्या जून महिन्यात ठाणे शहरात १३४ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यात जुलै महिन्याच्या पंधरवाड्यानंतर पुन्हा पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार हजेरी लावल्याने झाडे उन्मळून पडण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत 47 झाडे उन्मळून पडली. त्यामुळे दोन महिन्यात 182 झाडे उन्मळून पडले असल्याची नोंद ठाणे महापलिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे नोंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे तसेच वाऱ्यामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी झाडे पडली होती. त्यामुळे जवळपास २९ वाहनांचे नुकसान झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झालेली आहे.

Last Updated :Jul 24, 2021, 2:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.