ETV Bharat / city

Civil Surgeon: मंगळसूत्र घाणवट ठेवून, सिव्हिल सर्जन विरोधात महिलांचे आंदोलन

author img

By

Published : Jul 5, 2022, 11:24 AM IST

Women movement
महिलांचे आंदोलन

8 कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ( Collector Office ) एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले आहे की, वर्षभरापासून आमची ससेहोलपट सुरू आहे. वेतन होत नसल्याने संसाराचा गाडा चालवणे, अवघड झाले आहे. गळ्यातील मंगळसूत्र सोनाराकडे घाणवट ठेवले आहे, सावकाराकडून ( money lender ) कर्ज काढले, मुलांचे अडमिशन थांबले, अशा अनेक व्यथा त्यांनी सांगितले आहेत. आमचे वेतन सिव्हिल सर्जन ( Civil Surgeon ) यांच्या गलथान कारभारामुळे झाले आहे.

सोलापूर : पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात ( Pandharpur Sub-District Hospital ) काम करत असलेल्या एनआरएचएमच्या 8 कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून वेतन मिळाले नाही. आपल्या कामाचे आणि हक्काचे वेतन मिळावे, यासाठी या 8 कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ( Collector Office ) एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले आहे की, वर्षभरापासून आमची ससेहोलपट सुरू आहे. वेतन होत नसल्याने संसाराचा गाडा चालवणे, अवघड झाले आहे. गळ्यातील मंगळसूत्र सोनाराकडे घाणवट ठेवले आहे, सावकाराकडून ( money lender ) कर्ज काढले, मुलांचे अडमिशन थांबले, अशा अनेक व्यथा त्यांनी सांगितले आहेत. आमचे वेतन सिव्हिल सर्जन ( Civil Surgeon )यांच्या गलथान कारभारामुळे झाले आहे. त्यांनीच वेतन सुरळीत करावे, अन्यथा आम्ही आषाढ वारीत विठ्ठल मंदिरासमोर आत्मदहन करू असा इशारा दिला आहे.

महिलांचे आंदोलन

या 8 कर्मचाऱ्यांच्या पगार झाल्या नाहीत- सीता गणेश घंटे, लक्ष्मी ज्ञानेश्वर नांदरे, महादेवी रामचंद्र वैरागकर, प्रशांत शिवाजी म्हस्के, रेखा किशोर आगवणे, अंजली सुनील राठोड, साधना मंगेश आंबेकर, ज्ञानेश्वर पाटील हे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सपोर्ट स्टाफ, अटेंडन्ट, वॉचमन, आया, मावशी, कुक अशा पदांवर काम करत आहेत. यांची 26 जानेवारी 2018 रोजी नियुक्ती एनआरएचएम ( राष्ट्रीय आरोग्य अभियान ) अंतर्गत झाली आहे. या नियुक्ती पत्रास सिव्हिल सर्जन यांचे आदेश जोडण्यात आले आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी पुनर्नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना 6 हजार वेतन देण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळात पगार वाढ करत कोविड भत्ता आणि इतर भत्ते असे मिळून मार्च 2021 पासून ऑगस्ट 2021 पर्यंत 15 हजार 500 रुपये वेतन देण्यात आली होती.

सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयाकडून वेतन कपात सुरू- पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या या 8 कर्मचाऱ्यांना सिव्हिल सर्जन कार्यालयाकडून सांगितले गेले की, तुम्हाला 6 हजार ऐवजी 15 हजार 500 रुपये हे वेतन चुकून आले आहे. त्याची वसुली किंवा वेतन कपात सुरू केली जाणार आहे, आणि ऑगस्ट 2021 पासून या 8 कर्मचाऱ्यांना आजतागायत एक रुपया देखील वेतन दिले गेले नाही. अनेक निवेदने देण्यात आली आहेत. जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी, एनआरएचएमच्या लेखाव्यवस्थापक, डीपीएम यांना भेटून व्यथा मांडल्या, पण हे सर्व अधिकारी हाथ झटकण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती आंदोलकांनी यावेळी बोलताना दिली आहे.

गळ्यातील मंगळसूत्र घाणवट ठेवून आंदोलनाला आल्या- एनआरएचएम अंतर्गत नियुक्त असलेल्या महिला या गेल्या वर्षभरापासून वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे संसाराचा गाडा हाकण्यासाठी सावकारांकडून कर्ज काढले, मुलांचे शालेय व महाविद्यालयीन अडमिशन थांबले. तसेच आंदोलनाला येण्यासाठी गाडीखर्च देखील नव्हता. त्यासाठी मंगळसूत्र गहाण ठेवल्याची माहिती यावेळी बोलताना आरोग्य खात्यातील महिलांनी दिली आहे. तसेच आमच्या मागण्या मान्य न केल्यास किंवा 10 तारखेपर्यंत आम्हाला अगर वेतन अदा न केल्यास आम्ही आषाढी वारीत पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

सिव्हिल सर्जन कार्यालयातील प्रतिनिधी कडून समजूत घालण्याचा प्रयत्न - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एनआरएचएम मध्ये काम करणाऱ्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारी धरणे आंदोलनाला बसल्याची माहिती मिळताच सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप ढेले यांनी आपल्या कार्यालयातील कार्यालय अधीक्षक विष्णू पाटील यांना समजूत घालून आंदोलन मागे घेण्यासाठी समजूत घालण्यासाठी प्रतिनिधी पाठवले, पण आंदोलनाला बसलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्या शिवाय उठणार नाही, अशी भूमिका घेतली होती. हक्काचं वेतन मागत आहोत. वर्षभरापासून विना वेतन काम करत आहोत. आमच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे, अशी व्यथा सिव्हिल सर्जन यांचे प्रतिनिधी विष्णू पाटील यांसमोर मांडली.

हेही वाचा - Eknath Shinde on Heavy Rain : पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करा- मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.