Flood in pandharpur : पंढरपूरात पुराचा विळखा; झोपडपट्टीत शिरले पाणी

author img

By

Published : Sep 18, 2022, 5:20 PM IST

Updated : Sep 18, 2022, 5:56 PM IST

Flood in pandharpur

पंढरपूरात पूराची स्थिती निर्माण ( Flood situation in Pandharpur ) झाल्याने तेथिल नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. सर्व कुटुंबांना मंदिर समितीच्यावतीने जेवण आणि नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे.

पंढरपूर : उजनीच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये ( Catchment area of ​​Ujni ) झालेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरण आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता 107% टक्के भरले आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच उजनी मध्ये दौंड होऊन येणारी आवक वाढत असल्यामुळे धरण प्रशासनाच्या वतीने उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये (Bhima river basin) 110000 कयुसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे.

व्यास नारायण झोपडपट्टी मध्ये शिरले पूराचे पाणी : उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून पंढरपूर येथील व्यास नारायण झोपडपट्टी मध्ये पूराचे पाणी शिरल्याने व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. व्यास नारायण झोपडपट्टीतील शंभर कुटुंबांना प्रशासनावतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून या सर्व कुटुंबाची व्यवस्था कॉटेज हॉस्पिटल समोरील इमारतीमध्ये करण्यात आली आहे. या सर्व कुटुंबांना मंदिर समितीच्यावतीने जेवण आणि नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे.

पंढरपूरमधील मंदिरे पाण्याखाली : उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुर येथे भीमा नदी 1 लाख 30 हजार कयुसेक इतक्या विसर्गाने वाहत असल्यामुळे पंढरपूर मधील जुना दगडी पूल, वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. भीमा नदीतील पाणी व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये शिरले आहे. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदी आपल्या पात्राच्या बाहेर वाहत असून गोपाळपूर येथील विष्णुपद मंदिर हे संपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तसेच या भीमा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे शेती पिकाचेही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे.

Last Updated :Sep 18, 2022, 5:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.