ETV Bharat / city

मराठा क्रांती आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या आमदार, खासदारांवर गुन्हे दाखल

author img

By

Published : Jul 6, 2021, 3:39 PM IST

मराठा क्रांती मोर्चो
मराठा क्रांती मोर्चो

4 जुलै रोजी सकाळी संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला दोन खासदार, सात आमदार, महापौर यांचा सहभाग होता. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आक्रोश मोर्चा आयोजकांवर आणि मोर्चात सहभागी झालेल्या आमदार, खासदार, महापौर आणि नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर - सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापुरात 4 जुलै रोजी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पण कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने सोलापुरात अनेक निर्बंध लादले आहेत. सभा, मोर्चे आदींना परवानगी नाकारण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकऱ्यांना देखील 4 जुलै रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाला पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी परवानगी नाकारली होती. तरीही रविवारी 4 जुलै रोजी सकाळी संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला दोन खासदार, सात आमदार, महापौर यांचा सहभाग होता. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आक्रोश मोर्चा आयोजकांवर आणि मोर्चात सहभागी झालेल्या आमदार, खासदार, महापौर आणि नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'यांच्यावर' गुन्हा दाखल

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाला भारतीय जनता पार्टीकडून संपूर्ण पाठिंबा होता. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे नेते याठिकाणी फिरकले नाहीत. आक्रोश मोर्चाला जे सहभागी झाले त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १) किरण शंकर पवार ( रा. जुनी पोलीस लाइन, मुरारजी पेठ, सोलापूर), २) राम अनिल जाधव (रा. ११६, राघवेंद्र नगर, मुरारजी पेठ, सोलापूर), ३) खासदार डॉ. जयसिध्देश्वर, ४) खासदार रणजित नाईक-निंबाळकर, ५) नरेंद्र पाटील ६) आमदार विजयकुमार देशमुख, ७) आमदार सचिन कल्याणशेट्टी, ८) आमदार प्रशांत परीचारक, ९) आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील, १०) आमदार समाधान अवताडे, ११) आमदार राजेंद्र राऊत, १२) आमदार राम सातपुते, १३) श्रीकांचना यन्नम महापौर, १४) नगरसेवक शिवानंद पाटील, १५) नगरसेवक नागेश भोगडे, १६) नगरसेवक अमर पुदाले, १७) नगरसेवक विनायक विटकर, १८) धैर्यशील मोहिते पाटील, १९) शहाजी पवार, २०) लक्ष्मणराव ढोबळे, २१) अनंत जाधव, २२) विक्रम देशमुख, २३) सतिश ऊर्फ बिज्जु प्रधाने, २४) राजु सुपाते, २५) श्रीकांत देशमुख, २६) नगरसेवक संतोष भोसले, २७) सोमनाथ राऊत, २८) प्रसाद लोंढे, २९) निखील भोसले, ३०) विजयकुमार डोंगरे, ३१) मोहन डोंगरे, ३२) ललीत धावणे, ३३) मतीन बागवान, ३४) प्रताप कांचन पाटील, ३५) मनोज शिंदे, ३६) विजयकुमार साठे, ३७) राजकुमार पाटील, ३८) सौदागर क्षिरसागर, ३९) विष्णु बरगंडे, ४०) सुरेश भानुदार अंबुरे, ४१) अमिर यासीन मुलानी, ४२) पांडुरंग महादेव गायकवाड, ४३) मकरंद माने, ४४) अक्षय सुर्यवंशी, ४५) अक्षय अंजिखाने, ४६) सागर अतनुरे असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियम व अटींचा उल्लंघन केले आहे. तसेच सोशल डिस्टन्सचे कोणतेही पालन केले नाही. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. तर अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मंडले करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.