ETV Bharat / city

आरटीओ अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी 15 शेतकऱ्यांवर गुन्हे; अपघाताची खरी माहिती गुलदस्त्यातच

author img

By

Published : Mar 16, 2022, 4:47 PM IST

सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळजवळ कंटेनर आणि दुचाकीचा (Accident near Mohol) झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू (Farmer Died in accident) झाला होता. अपघातानंतर एक मोठा जमाव जमा झाला होता. या जमावाने आरटीओच्या अधिकाऱ्यांना मारहाण (RTO Officer beaten) केली होती. याप्रकरणी 15 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल (FIR On farmers) करण्यात आला आहे.

fir on farmers
शेतकरी जमाव

सोलापूर - सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळजवळ कंटेनर आणि दुचाकीचा (Accident near Mohol) झालेल्या अपघातात मोहन अदमाने या शेतकऱ्याचा मृत्यू (Farmer Died in accident) झाला होता. अपघातानंतर एक मोठा जमाव जमा झाला होता. या जमावाने हा अपघात तुमच्यामुळेच झाला आहे, असे कारण समोर करत आरटीओच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण (RTO Officer beaten) करत शासकीय गाडीच्या काचा फोडल्या होत्या. यामध्ये आरटीओ वाहनाचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच आरटीओ मोटार वाहन निरीक्षक शिवाजी सोनटक्के व राजेश अहुजा यांना जमावाने जबर मारहाण केली होती. याबाबत आरटीओ शिवाजी सोनटक्के यांच्या तक्रारीवरून पंधरा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

भा.द.वि.353 , 332, 337 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, हा अपघात कसा झाला? याला जबाबदार कोण आहे? याची सर्व माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे. कारण अपघातातील प्रमुख नेत्रसाक्षीदार कंटेनरचालक अद्यापही फरार आहे. अपघातानंतर जमाव प्रक्षुब्ध होऊन आरटीओ अधिकाऱ्यांना मारहाण व आरटीओ वाहनाची तोडफोड करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

महामार्गावर थांबलेल्या कंटेनरचे कागदपत्रे तपासणी करताना अपघात झाल्याची तक्रार -

उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक राजेश रणजीत आहुजा व शिवाजी निवृत्ती सोनटक्के यांच्यासह वाहनचालक शिवाजी गायकवाड हे मोहोळ पोलीस ठाणे येवून एका अपघातामधील टाटा पिकअप गाडीची तपासणी करून त्याचा अहवाल देऊन सोलापूरकडे निघाले होते. दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास मोहोळ हद्दीमध्ये हॉटेल शीतलजवळ रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच ४६ बीएम २९१०) हा थांबलेला दिसला. हा कंटेनर का उभा आहे, याची माहिती घेण्यासाठी आरटीओ अधिकारी आपले शासकीय वाहन कंटेनरच्या समोर उभे करून कंटेनर चालकाकडे चौकशी करत होते. यावेळी पाठीमागून आलेल्या मोटारसायकल चालक मोहन अदमाने हे कंटेनरला जोरदार धडकले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल-

सोमवारी दुपारी सोलापूर पुणे महामार्गावर अपघातात मोहन अदमाने या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर मोठा जमाव येऊन आरटीओ अधिकाऱ्यांना मारहाण करून मोहोळ पोलीस ठाण्यात जमाव आला होता. पोलीस ठाण्यात आलेला जमाव नियंत्रणबाहेर जात होता. मोहोळ पोलिसांनी अमोल अर्जुन अदमाने यांच्या तक्रारीवरून आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली. शेतकऱ्यांची बाजू ऐकून राजेश अहुजा, शिवाजी सोनटक्के व इतर तीन आरटीओ अधिकारी व कर्मचारी विरोधात भा.द.वि. 304-अ, 427, प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला.

अपघात कसा झाला याचे कारण गुलदस्त्यातच-

अपघातानंतर शेतकऱ्यांचा मोठा जमाव होऊन आरटीओ अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. गोळा झालेल्या जमावाने हा अपघात आरटीओच्या गाडीमुळेच झाला आहे, असे म्हणत संबंधित अधिकाऱ्यांना मारहाण करीत शासकीय गाडीच्या काचा फोडल्या होत्या. आरटीओ अधिकारी म्हणतात आम्ही गाडी आडवी लावून धावत्या कंटेनरला थांबविले नाही, तर शेतकरी म्हणतात आरटीओ अधिकाऱ्यांनी धावत्या कंटेनरला अचानक थांबवल्याने मोटारसायकल चालक मागून येऊन जोरदार धडकला. यामध्ये खरे काय आहे, त्याचा तपास पोलीस करत आहेत. कंटेनरचालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. मात्र, कंटेनर पोलिसांच्या ताब्यात आहे. लवकरच त्या कंटेनरचालकाचा तपास लावून खरी माहिती समोर येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.