ETV Bharat / city

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीला सुरुवात

author img

By

Published : Apr 17, 2022, 3:28 PM IST

Updated : Apr 17, 2022, 4:04 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीस सुरुवात ( Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) झाली आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहास प्रारंभ झाला. 14 एप्रिलनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी सोलापूर शहरात भव्य मिरवणूक काढली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमुळे दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यंदाच्या वर्षी मिरवणुकीस परवानगी देण्यात आली आहे.

छायाचित्र
छायाचित्र

सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीस सुरुवात झाली ( Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहास प्रारंभ झाला. 14 एप्रिलनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी सोलापूर शहरात भव्य मिरवणूक काढली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमुळे दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यंदाच्या वर्षी मिरवणुकीस परवानगी देण्यात आली आहे. सोलापूर मध्यवर्ती बसस्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ) तसेच सात रस्ता, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक आदी परिसरातून मिरवणूक काढली जाते. यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीला सुरुवात

मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीवरून तणाव - मिरवणूक उत्सव सुरू होण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत सोलापुरातील सर्व आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी मिरवणुकी दरम्यान कायद्याचे उल्लंघन होणार नाही याच्या सूचना केल्या. यावर डीजे लावणारच अशी भूमिका मांडत उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी बैठकीत उठून गेले. यावरून पोलीस प्रशासन आणि आंबेडकर अनुयायी यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन बेस दोन टॉपची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चे, धरणे आंदोलन झाली. रविवारी (दि. 17 एप्रिल) दुपारपासून मिरवणुकीला उत्सवाला सुरुवात झाली आहे.

सुमारे 200 मंडळ जयंती उत्सवात सहभागी - सोलापूर शहरात दोन मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ स्थापन करण्यात आली आहे. तर त्यांना संलग्नित असलेल्या सुमारे 200 मंडळानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात सहभाग नोंदविला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा - Bhimsainik Stop Slogan Near Mosque : मशिदीवरील भोंग्याचा सोलापुरात आदर; अजान सुरू असताना घोषणाबाजी बंद

Last Updated : Apr 17, 2022, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.