सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल; 20 जूनपासून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार!

author img

By

Published : Jun 11, 2022, 9:58 PM IST

Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University

सोलापूर विद्यापीठाच्या (Solapur University) परीक्षा विभागाकडून परीक्षा घेण्यासंदर्भात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्या शाखांच्या परीक्षा 20 जून 2022 पासून ऑफलाइन आणि डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार असल्याची (All exams are Start 20th June 2022) माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर (Dr. Shivkumar Ganpur) यांनी दिली. डॉ. मृणालिनी फडणवीस (Dr. Mrinalini Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा 20 जून 2022 पासून ऑफलाइन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने घेण्याचे नियोजन आहे. अफवांवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच अधिकृत माहिती विद्यार्थ्यांना कळेल.

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्या शाखांच्या परीक्षा 20 जून 2022 पासून ऑफलाइन आणि डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली. पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

20 जून ते 7 ऑगस्टदरम्यान सर्व परीक्षा : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार तसेच बीओएसच्या प्रश्नपत्रिका रचनेनुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा 20 जून 2022 पासून ऑफलाइन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा विभागाकडून पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात 24 तर ग्रामीण भागात 47 असे एकूण 71 केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. यामध्ये पदवी व पदव्युत्तर मिळून एकूण 70 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सम सत्राच्या या परीक्षा आहेत. सुरुवातीला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. 20 जून ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

वाढीव वेळ म्हणून 15 मिनिटं ज्यादा मिळणार : कोरोना काळात सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्या होत्या.ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय कमी झाली. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एका तासाला पंधरा मिनिटे अधिकचा वेळ विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दिला जाणार आहे.

Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

अफवांवर विश्वास ठेवू नका : सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परीक्षा घेण्यासंदर्भात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार 20 जून 2022 पासून ऑफलाईन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने या परीक्षा सुरू होतील. मात्र, काही जणांकडून परीक्षेसंदर्भात अफवा पसरवण्यात येत आहे, अशा अफवांवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच अधिकृत माहिती विद्यार्थ्यांना कळेल. इतर कोणत्याही माध्यमांवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी केले आहे.

हेही वाचा : Exam Fever 2022 : सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभागाची तयारी पूर्ण; 71 केंद्रांवर 70 हजार विद्यार्थी देणार परीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.