ETV Bharat / city

सोलापुरात हनुमान चालिसासाठी मोहित कंबोजनी कुरियरने पाठवले भोंगे

author img

By

Published : May 4, 2022, 4:07 PM IST

bjp leader mohit kamboj sent speaker by courier for hanuman chalisa in solapur temple
सोलापुरात हनुमान चालिसासाठी मोहित कंबोजनी कुरियरने पाठवले भोंगे

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी आवाहन केल्या प्रमाणे ज्यां मंदिरांना हनुमान चालीसासाठी भोंगे पाहिजे त्यांनी ऑनलाइन अर्ज करावा असे आवाहन केले होते.त्यानुसार सोलापूर शहरातील मुरारजी पेठ (जुनी पोलीस लाईन) येथील दक्षिण मुखी पावन मारुती मंदिर याच्या विश्वासतांनी मोहित कंबोज यांकडे ऑनलाइन अर्ज केला. त्यानुसार भोंगा,त्याला लागणारे इतर साहित्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू(एम्प्लि) सोलापुरात कुरियरद्वारे दाखल झाले.

सोलापूर - मंदिरावरून हनुमान चालीसासाठी मोहित कंबोज यांनी सोलापुरातील हिंदू बांधवाना भोंगे पाठवले आहे.मुरारजी पेठ येथील दक्षिणमुखी पावन मारुती मंदिरासाठी हे भोंगे आले आहेत.मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक व भाजप नेते किरण पवार यांनी मोहित कंबोज यांसोबत संपर्क करून हे भोंगे मागवून घेतले असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाला माहिती होताच पोलिसांनी या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित केले आहे.भोंगे लावण्याबाबत परवानगी घेतली का याची तपासणी सुरू केली आहे.

सोलापुरात हनुमान चालिसासाठी मोहित कंबोजनी कुरियरने पाठवले भोंगे

ऑनलाइन अर्ज केल्याने भोंगा आला - भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी आवाहन केल्या प्रमाणे ज्यां मंदिरांना हनुमान चालीसासाठी भोंगे पाहिजे त्यांनी ऑनलाइन अर्ज करावा असे आवाहन केले होते.त्यानुसार सोलापूर शहरातील मुरारजी पेठ (जुनी पोलीस लाईन) येथील दक्षिण मुखी पावन मारुती मंदिर याच्या विश्वासतांनी मोहित कंबोज यांकडे ऑनलाइन अर्ज केला. त्यानुसार भोंगा,त्याला लागणारे इतर साहित्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू(एम्प्लि) सोलापुरात कुरियरद्वारे दाखल झाले.

दररोज सकाळपासून हनुमान चालीसा पठण - मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक व भाजपचे युवा नेते किरण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ,या मंदिरात सुरुवातीपासून भोंगा आहे. आम्ही फक्त बदलून नवीन भोंगा बसविला आहे. आणि यावरून सोलापूर पोलीस भोंगे काढा, परवानगी घेतली का, असे अनेक प्रश्न विचारत आहेत. दिवसा भोंगे लावण्यासाठी परवानगी कशाची लागते असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.