ETV Bharat / city

Ramdas Athwale : 'भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेवर कारवाईसाठी राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करणार'

author img

By

Published : May 5, 2022, 10:06 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेना क्लिन चिट मिळाली असेल तर कारवाईसाठी राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करु, अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली ( Minister Ramdas Athawale On Sambhaji Bhide ) आहे.

Ramdas Athwale
Ramdas Athwale

सोलापूर - भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंना क्लिन चीट मिळाली आहे. याप्रकरणी आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेना क्लिन चिट मिळाली असेल तर कारवाईसाठी राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करु. मात्र, संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ( Minister Ramdas Athawale On Sambhaji Bhide ) होते.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत. वास्तविक पाहता भगवा रंग हा शांतीचा, वारकरी सांप्रदायाचा रंग आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. राज ठाकरेंच्या भोंग्या संबंधातील भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही.

संविधान विरोधी भूमिका - राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढून त्यांच्या समोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची भूमिका घेतली आहे. हा प्रश्न सामाजिक नसून धार्मिक स्वरूपाचा आहे. धर्माचा बुरखा घालून कोणी संविधानाविरोधात काम करत असेल तर आमचा त्यांना विरोध असेल, असेही आठवलेंनी स्पष्ट केले आहे.

रामदास आठवले प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

राज्य सरकार अपयशी - ओबीसी किंवा मराठा समाजाला मिळणार आरक्षण असो राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास अपयशी ठरले आहे. आता या सरकारची जबाबदारी आहे, उभयतांना आरक्षण मिळवून द्यावे. भुमिहीनांना देशात प्रत्येकी पाच एकर जमीन कसण्यासाठी द्यावी. 20 कोटी एकर अतिरिक्त जमीन शिल्लक आहे. त्याचसोबत दोन हजारपर्यंतच्या गायरान वरील अतिक्रमणाच्या जागा संबंधितांच्या नावे कराव्यात. तसेच, 2019 पर्यंतच्या झोपड्याअधिकृत कराव्यात, अशी आमची मागणी असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले आहे.

हेही वाचा - AIMIM Rally In Aurangabad : मनसेच्या सभेनंतर एमआयएमदेखील दुपटीने सभा घेणार - खासदार इम्तियाज जलील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.