ETV Bharat / city

Pune Crime नग्न अवस्थेत तरुण घरात घुसला अन् थेट महिलेशेजारी जाऊन झोपला, पुण्यातील धक्कादायक प्रकार

author img

By

Published : Aug 19, 2022, 11:17 AM IST

एक तरुणाने नग्न अवस्थेत घरात घुसून थेट महिलेच्या शेजारी जाऊन झोपण्याचा धक्कादायक प्रकार येरवडा परिसरात घडला आहे. यासंबंधी 32 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस Deformed Accused ठाण्यात तक्रार दिली असून, याप्रकरणी विकृत आरोपीला Arun Lahu Galphande Arrested by Yerwada Police अटकदेखील Yerwada Police Station केली आहे.

Yerwada Police Station
येरवडा पोलीस स्टेशन

पुणे पुण्यातील येरवडा भागात एक अत्यंत धक्कादायक अन् किळसवाणा Shocking and Disgusting Incident प्रकार घडला आहे. एक तरुण नग्न अवस्थेत घरात घुसून थेट महिलेच्या शेजारी जाऊन झोपला. यासंबंधी 32 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, याप्रकरणी पोलिसांनी विकृत आरोपीला अटकदेखील केली आहे. Deformed Accused अरुण लहू गालफांडे Yerwada Police Station येरवडा पोलीस स्टेशन Arun Lahu Galphande Arrested by Yerwada Police वय २४, रा. यशवंतनगर, येरवडा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अरुण रिक्षाचालक असून, अविवाहित आहे. त्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याचेदेखील माहिती समोर आली आहे.


नग्न तरुण हा त्याच परिसरातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण हा रिक्षाचालक आहे. तो दिवसभर रिक्षा चालवितो. तो अविवाहित असून, या परिसरात राहणारा आहे. तो तक्रारदार महिलेला ओळखतो. दरम्यान, पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अरुण हा नग्न अवस्थेत तक्रारदार महिलेच्या घरात शिरला. तसेच, तक्रारदार यांच्या शेजारी जाऊन झोपला. तक्रारदार महिलेला अचानक जाग आल्यानंतर त्यांनी पाहिले असता त्या भीतीपोटी ओरडतच बाहेर पळत आल्या. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. तोपर्यंत अरुण हा पसार झाला होता.


तरुणाने असाच प्रकार अनेक वेळा केला, बिभत्स अवस्थेत फिरतो त्यानंतर महिलेने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पसार झालेल्या अरुणला महिला उपनिरीक्षक दर्शना शेलार व त्यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली. त्याने नशा केली होती का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. त्याने असे का केले, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या पूर्वीही त्याने अशा प्रकारे तीन महिलांसोबत केले आहे. याबाबत महिलांनी पुरावेदेखील दिले आहेत. तो परिसरातदेखील बिभत्स अवस्थेत फिरत असल्याचे दिसत असून, त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा Dahi Handi 2022 गोविंदा आला रे, महाराष्ट्रात दहीहंडीचा जाणून घ्या इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.