ETV Bharat / city

पुतण्यांकडून चुलतीचा विनयभंग; सांगवीत दोघांना अटक

author img

By

Published : Aug 7, 2020, 11:37 AM IST

sangavi police news
सांगवी पोलीस न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हे तक्रारदार महिलेचे पुतणे आहेत. महिला घरात एकटी असताना दोन्ही आरोपींनी मद्यपान करून जबरदस्तीने घरात प्रवेश केला. तक्रारदार महिलेला हाताने मारहाण करून बेडवर पाडून त्यांच्या अंगावरील कपडे फाडले. तसेच त्यांच्याशी झटापट करत विनयभंग केला, असे तक्रारीत म्हटले आहे.

पुणे - पिंपरी-चिंचवडमधील सांगवीमध्ये मद्यपान करून आलेल्या पुतण्यांनी चुलतीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी प्रमोद नंदू ढोकळे, विजू दत्तात्रय ढोकळे या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हे तक्रारदार महिलेचे पुतणे आहेत. महिला घरात एकटी असताना दोन्ही आरोपींनी मद्यपान करून जबरदस्तीने घरात प्रवेश केला. तक्रारदार महिलेला हाताने मारहाण करून बेडवर पाडून त्यांच्या अंगावरील कपडे फाडले. तसेच त्यांच्याशी झटापट करत विनयभंग केला, असे तक्रारीत म्हटले आहे.

मुलाला जीवे मारू अशी धमकी ही आरोपींनी महिलेला दिली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शेंडकर यांनी दिली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून आरोपींना त्यादिवशी अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.