ETV Bharat / city

Independence Day 14 ऑगस्ट 1947 च्या आठवणींना दिला महाजनांनी उजाळा

author img

By

Published : Aug 14, 2022, 7:41 PM IST

Updated : Aug 14, 2022, 7:49 PM IST

स्वतंत्र महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tricolor Campaign राबवली जात आहे. देशभरात या मोहिमेला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जरी झाले असले तरी आजही काही ज्येष्ठ मंडळींना 14 ऑगस्टची ती रात्र आणि 15 ऑगस्ट 1947 सालीचा तो दिवस आठवत आहे.

Botanist Dr Shri D Mahajan
डॉ श्री.द.महाजन

पुणे सध्या देशभरात स्वतंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष Jubilee Year of Independence हे दिमाखात साजरा केला जात आहे तसेच यंदाच्या स्वतंत्र महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tricolor Campaign राबवली जात आहे. देशभरात या मोहिमेला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जरी झाले असले तरी आजही काही ज्येष्ठ मंडळींना 14 ऑगस्टची ती रात्र आणि 15 ऑगस्ट 1947 सालीचा तो दिवस आठवत आहे. पुण्यातील 90 वर्षीय वनस्पतीतज्ञ डॉ श्री.द.महाजन Botanist Dr Shri D Mahajan यांनी अशाच आपल्या 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 1947 च्या आठवणी सांगितल्या आहे.14 ऑगस्ट 1947 च्या रात्री आणि पहाटे 15 ऑगस्ट ला नेमकं पुण्यात काय घडल होत.जाणून घेऊया...

Botanist Dr Shri D Mahajan
वनस्पतीतज्ञ डॉ श्री.द.महाजन

अशी होती ती रात्र आणि स्वातंत्र्याचा दिवस 14 ऑगस्ट 1947 साली डॉ.श्री.द.महाजन यांचं वय हे 15 वर्षाचं होत.ते त्यावेळेस बुधवार पेठेत वाडा होता तिथं राहत होते. ग्रामदैवत जोगेश्वरी मंदिराच्या अगदी जवळ. बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालयात महाजन यांचे शिक्षण झाले.स्वातंत्र्याच्या आदल्या रात्री आपण पारतंत्र्यात होतो आणि दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्यात होतो. जस जशी रात्र जात होती तस तस आम्ही घरातील सर्वजण हे रात्री बारा वाजल्याची वाट पहात होतो.आणि पाहता पाहता रात्रीचे बारा वाजले.आणि आम्ही आभाळात पाहिलं की हे भारतीय स्वातंत्र्याच आभाळ आहे आणि मनातील आनंद हा गागणला भिडलं.आणि निवांत झोपलो. आणि सकाळी जागे झालो ते स्वतंत्र भारतामध्येच. तेव्हा आम्हाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी सुटी दिली नव्हती. कारण स्वातंत्र्य दिन शाळेत साजरा करायचा होता. प्रत्येक विद्यार्थ्याला एक पेढा देण्यात आला. तसेच एक गोल बिल्लाही मिळाला. त्यावर १५ ऑगस्ट १९४७ असे लिहिलेले होते. ते सर्व पाहून आम्ही हुरळून गेलो. आपले इतक्या वर्षांचे स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले होते. तोपर्यंतच्या आयुष्यात कधीच इतका आनंद झाला नव्हता, एवढा स्वातंत्र्याच्या दिवशी झाला. शाळेत सर्वजण नाचलो,ओरडलो. सर्वांना आनंदाचं भरतं आलं होतं. त्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी वर्गात अभ्यास काही झाला नाही. सर्वजण स्वातंत्र्यदिन साजरा करण्यातच गुंग होते. आम्हाला शिक्षकांनी स्वातंत्र्याची माहिती दिली.असा हा दिवस आजही आम्हाला आठवत आहे अशी माहिती यावेळी महाजन यांनी दिली.

महात्मा गांधीजी यांची झाली भेट 1942 च्या भारत छोडो आंदोलना Quit India Movement दरम्यान महात्मा गांधी यांना आगाखान पॅलेस Aga Khan Palace येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. तेव्हा आम्हा मुलांना महात्मा गांधी यांना भेटण्याची खूप उत्सुकता होती. त्यामुळे आम्ही आठ ते दहा जणांनी ठरवले की गांधीजींना भेटायचेच. मग घरी व शिक्षकांना सांगितले आणि पायी चालत चालत, पत्ता विचारत आगाखान पॅलेस इथे गेलो. तोपर्यंत प्रार्थनेला आत सोडण्याची वेळ संपली होती. आगाखान पॅलेस येथे सायंकाळी महात्मा गांधी प्रार्थना तोपर्यंत प्रार्थनेला आत सोडण्याची वेळ संपली होती. आगाखान पॅलेस येथे सायंकाळी महात्मा गांधी प्रार्थना सभा घ्यायचे. त्या प्रार्थनेला नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी इंग्रजांनी दिली होती. आम्ही गेटवर उभे होतो. तिथल्या ब्रिटिश साहेबांनी आम्हाला पाहिले. त्यांनी आत सोडायला सांगितले. मग हळूहळू दबकत प्रार्थनेला जाऊन बसलो. प्रार्थनेला महात्मा गांधी हे हिंदीमध्ये बोलत होते. ते काय बोलत होते हे समज नव्हतं, पण आम्ही त्यांच्याकडे पाहूनच भारावलो होतो.जेव्हा प्रार्थना झाली त्यावेळेस जे जे लोक उपस्थित होते तेथे लोक महात्मा गांधी यांना भेटत होते जेव्हा महात्मा गांधी यांना भेटायचं होतं तेव्हा आपलं स्वतःचं नाव सांगायचं होत.माझं जेव्हा नंबर आल तेव्हा मी माझं नाव सांगितल आणि तेव्हा महात्मा गांधी यांनी माझ्या डाव्या खांद्यावर हात ठेवला.आजही मला तो क्षण आठवत आहे. असं देखील यावेळी महाजन म्हणाले.


हेही वाचा Rakesh Jhunjhunwala राकेश झुनझुनवाला शेअर बाजाराचे बिग बुल कसे बनले

Last Updated :Aug 14, 2022, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.