Ashadhi Wari 2022 in Pune : पुणे मेट्रोमध्ये वारकऱ्यांचा विठूनामाचा गजर.....

author img

By

Published : Jun 24, 2022, 12:35 PM IST

Vithunama alarm of Warkaris in Pune Metro

दोन वर्षांनंतर हजारो वारकऱ्यांच्या ( Ashadhi Wari ) उपस्थितीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj ) आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ( Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony ) पुण्यनगरीत आगमन झाल्यानंतर पुणेकरांच्या वतीने विविध सोईसुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. अशातच विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि सारथी कट्टा यांच्या वतीने १०० वारकऱ्यांना मेट्रोची सफर घडविण्यात आली. वारकऱ्यांनी मेट्रोतच धरला भजनाचा ठेका ( Metro Bhajan ), वारकऱ्यांनी मेट्रोचा आनंद घेतला. ( Warakaris enjoyed the metro )

पुणे : दोन वर्षांनंतर आषाढी वारीच्या निमित्ताने ( Ashadhi Wari ) हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj ) आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ( Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony ) पुण्यनगरीत आगमन झाल्यानंतर पुणेकरांच्या वतीने विविध सोईसुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. अशातच विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि सारथी कट्टा यांच्या वतीने १०० वारकऱ्यांना मेट्रोची सफर ( Metro journey for 100 Warkaris )घडविण्यात आली.

पुणे मेट्रोमध्ये वारकऱ्यांचा विठूनामाचा गजर
पुणे मेट्रोत वारकरी भजनात तल्लीन : गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाजपर्यंत आणि पुन्हा गरवारे स्थानकापर्यंत वारकरी टाळ आणि मृदंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करीत होते. काहींनी फुगड्या घातल्या तर काहींनी भक्तीरसात चिंब भिजत भजनावर ठेका धरला. तर काहींनी तल्लीन होऊन नृत्य केले. जेव्हा वारकरी पुण्यात दाखल झाले, तेव्हा त्यांनाही मेट्रोचा आनंद घेता यावा यासाठी वारकऱ्यांना गरवारे स्टेशन ते वनाज कॉर्नरपर्यंत मेट्रोचा सफर घडविण्यात आली.
Vithunama alarm of Warkaris in Pune Metro
पुणे मेट्रोमध्ये वारकऱ्यांचा विठूनामाचा गजर

हेही वाचा : Ashadhi Wari 2022 : जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी; पाहा, पालखी सोहळ्यातील खास छायाचित्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.