ETV Bharat / city

Udayanraje Bhosale meet ajit pawar - जसे सर्वधर्म समभाव, तसे सर्व पक्ष समभाव - खासदार उदयनराजे भोसले

author img

By

Published : Feb 5, 2022, 3:44 PM IST

भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले पुन्हा घरवापसी करणार, अशी चर्चा मध्यंतरी सुरू असताना आज उदयनराजे पुण्यात असताना त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. यावर, शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे एक संकल्पना मांडली होती की, सर्वधर्म समभाव. तसे माझे म्हणणे आहे की, सर्वपक्ष समभाव, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale meet ajit pawar ) यांनी दिली.

Udayanraje Bhosale meet ajit pawar
अजित पवार भेट उदयनराजे भोसले

पुणे - भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले पुन्हा घरवापसी करणार, अशी चर्चा मध्यंतरी सुरू असताना आज उदयनराजे पुण्यात असताना त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. यावर, शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे एक संकल्पना मांडली होती की, सर्वधर्म समभाव. तसे माझे म्हणणे आहे की, सर्वपक्ष समभाव, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

माहिती देताना खासदार उदयनराजे भोसले

हेही वाचा - Ajit Pawar On Pune School : पुण्यातील शाळांबाबत अजित पवार म्हणाले, "सोमवारपासून..."

पुण्यातील सर्किट हाऊस येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Udayanraje Bhosale meet ajit pawar ) यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. महिन्याअखेरीस जे अधिवेशन होणार आहे, सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे, असे यावेळी उदयनराजेंनी सांगितले.

नुकतेच राज्य सरकारच्यावतीने वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत उदयनराजे भोसले यांना विचारले असता, ही लोकशाही आहे. या निर्णयाचा काही फायदा होणार की, नाही होणार हे निर्णय घेणाऱ्यांना विचारले तर बरे होईल. प्रत्येकाचे आयुष्य आहे, त्याने कसे वागावे हे त्याने ठरवावे. वाईन बंद करा, चालू करा, यापेक्षा लोकांनी आपापला विचार केला पाहिजे, असे यावेळी उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) म्हणाले.

हेही वाचा - Leaders' Flex War : नेत्यांची फ्लेक्स बाजी, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याची चुणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.